बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘आमदारांनी नाही तर उद्धव ठाकरेंनीच शिवसेनेशी गद्दारी केली’ -नारायण राणे

मुंबई। सत्तांतरानंतर शिंदे गट विरूद्ध शिवसेना वाद शिगेला पोहोचला आहे. अशातच दसरा मेळाव्यावरून विरोधकांनी शिवसैनिकांना चांगलंच घेरलंय.

भाजप नेते नारायण राणे यांनी एका कार्यक्रमात बोलताना थेट उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. शिंदे गटातील आमदारांचा गद्दार म्हणून उल्लेख करत उद्धव ठाकरे गेल्या अनेक दिवसांपासून आक्रमक झाले आहेत. उद्धव ठाकरेंच्या याच टीकेला राणेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.

आमदारांनी शिवसेनेशी गद्दारी केली नाही, तर स्वतः उद्धव ठाकरेंनीच शिवसेनेशी गद्दारी केली. भाजप आणि जनतेशी गद्दारी करतच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अशी बोचरी टीका नारायण राणेंनी केली.

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More