बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘आगे आगे देखिए होता है क्या’, नारायण राणेंनी पुन्हा मुख्यमंत्र्यांना डिवचलं

मुंबई | राज्याचे माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh), राष्ट्रवादीचे नेते नबाब मलिक (Nawab Malik) यांच्यानंतर आता ठाकरे कुटुंबीयांचे निकटवर्तीय ईडीच्या (ED) रडारवर आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे मेहुणे व रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांचे सख्खे भाऊ श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे.

व्यावसायिक श्रीधर पाटणकर (Shridhar Patankar) यांना ईडीने जोरदार धक्का दिला. पाटणकरांच्या ठाण्यातील निलांबरी प्रकल्पातील 11 सदनिका जप्त करण्यात आल्या आहेत. ईडीने पाटणकरांची जवळपास साडे सहा कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. या कारवाईनंतर भाजप नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी मुख्यमंत्र्यांना डिवचलं आहे.

आगे आगे देखिए होता है क्या, असं सूचक वक्तव्य राणेंनी केलं आहे. सव्वा दोन वर्षात महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना, एसटी कर्मचाऱ्यांना काय मिळाले? त्यांच्या नशिबी आत्महत्या आणि आप्तांच्या तिजोऱ्यांमध्ये मात्र कोट्यवधींची भर. शिवसैनिकांच्या वाट्याला काहीही नाही. सत्ता फक्त आपण आणि आपल्या नातेवाईकांसाठीच, असा टोला राणेंनी लगावला आहे.

दरम्यान, पाटणकरांवरील कारवाईनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपाला सुरूवात झाली आहे. ईडीच्या कारवाया सूडबुद्धीने होत असल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून केला जात आहे. तर या कारवाईनंतर ही संपत्ती कुठून आली? कोणाकडून आणली? असा सवाल राणेंनी उपस्थित केला आहे.

 

थोडक्यात बातम्या-

Uddhav Thackeray: मुख्यमंत्र्यांच्या मेव्हण्यावर ईडीची कारवाई, राजकीय वर्तुळात हालचालींना वेग

“…तर तो माझा शेवटचा क्षण असेल”, पंकजा मुंडेंचं भावनिक प्रत्युत्तर

शिवसेना आणि भाजप भविष्यात एकत्र येणार?; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं…

“राष्ट्रवादीने टाकलेली ती एक गुगली होती, आता शिवसेनेचं हिंदुत्व फिकं पडतंय”

“देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य मोदींना देखील मान्य नसेल, 1993च्या दंगलीत…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More