Top News महाराष्ट्र मुंबई

‘माझ्या जीवाचं काही बरं-वाईट झाल्यास राज्य सरकार जबाबदार’; भाजप खासदाराचा सरकारला इशारा

मुंबई | ठाकरे सरकारने भाजप नेत्यांसह इतर राजकीय नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाजप नेत्यांनी आणि मनसे नेत्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. अशातच भाजप नेते आणि खासदार नारायण राणेंनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे.

माझ्या जीवाचं काही बरं-वाईट झाल्यास राज्य सरकार जबाबदार असेल, असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे. त्यासोबतच, यापूर्वी देखील माझी सुरक्षा कमी करण्यात आली होती. पण मला काही फरक पडत नाही माझ्याकडे केंद्राची सुरक्षा असल्याचं नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

नारायण राणेंप्रमाणे भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारवर निशाणा साधला. सुरक्षा काढली याबद्दल सरकारचे धन्यवाद पण लोकांच्या सुरक्षेसाठी आमचा आवाज बंद होणार नाही, असं मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, भाजप नेत्यांमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रविण दरेकर, प्रसाद लाड, रावसाहेब दानवे आणि इतरही भाजप नेत्यांच्या सुरक्षा अवस्थेत कपात करण्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या-

“ज्यांच्याकडे महाराष्ट्र सैनिकांची एवढी सुरक्षा आहे त्यांची झेड सुरक्षा काढून काय तीर मारणार”

आमचं संरक्षण केवळ पोलीस करतो असं नाही- रावसाहेब दानवे

‘इतर नेत्यांची सुरक्षा कमी केली आहे तर….’; शरद पवारांची गुगली

‘देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजप नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात’; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

अभिनेत्री भाग्यश्री मोटेचा हाॅट अंदाज; चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंटचा पाऊ

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या