“अजित पवार माझ्या नादाला लागू नका, पुण्यात येऊन बारा वाजवीन”

कोल्हापूर | विरोधी पक्षनेते अजित पवारांनी (Ajit Pawar) केलेल्या टीकेला केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी आता प्रत्युत्तर दिलं आहे. नारायण राणे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना अजित पवारांनी केलेल्या टीकेचा समाचार घेतला.

अजित पवार (Ajit Pawar) माझ्या नादाला लागू नका. अजित पवारांचे पुण्यात येऊन बारा वाजवीन, असा इशारा नारायण राणे यांनी अजित पवारांनी दिला आहे.

दरम्यान, चिंचवडमध्ये बोलताना अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर बोचरी टीका केली होती. शिवसेना फोडणारे आणि शिवसेनेला सोडून गेलेले कसे पराभूत झाले हे सांगताना त्यांनी राणेंना तर वांद्रेत बाईनं पाडलं असं अजित पवार म्हणाले.

वांद्रे पोटनिवडणुकीत 2015 मध्ये त्यावळी काँग्रेस उमेदवार नारायण राणेंचा शिवसेनेच्या तृप्ती सावंत यांनी पराभव केला होता. त्यामुळे अजित पवार बाईनं पाडलं म्हणत राणेंना डिवचलं होतं.

संजय राऊत यांनी तोच मुद्दा पकडत ट्विट करून अजितदादांचं कौतुक केलं होतं. दादा म्हणजे कमाल आहे. कमाल की चीज नेता असाच असतो, एकदम मोकळा ढाकळा. सहज सोप्या भाषेत थेट संदेश जय महाराष्ट्र, असे ट्विट करत व्हिडिओ पोस्ट केला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More