Narayan Rane | ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज 13 नोव्हेंबररोजी कोकण दौऱ्यावर आहेत. कोकणात त्यांच्या तीन सभा होणार आहेत. कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी येथे या सभा पार पडणार आहेत. कणकवली आणि कुडाळ येथे नितेश राणे आणि निलेश राणे निवडणुकीच्या मैदानात आहेत. राणेंच्या या दोन्ही सुपुत्रांविरोधात उद्धव ठाकरेंनी उमेदवार दिले आहेत. याच उमेदवारांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे आज कोकण दौऱ्यावर आहेत. (Narayan Rane)
मात्र, या दौऱ्या पूर्वीच खासदार नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना इशारा दिला आहे. राणेंना उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याबाबत प्रश्न करण्यात आला होता. त्यावर राणेंनी, “माझी सभा मग साडेतेरा तारखेला असणार. माझी सभा असणार 100 टक्के,” असं उत्तर दिलं होतं. तसंच अपशब्द बोलला ना तर म्हणाव एकच रस्ता आहे. हेलिकॉप्टरने जाऊ नको, बाय रोड जाऊन दाखव, असा थेट इशाराच राणे यांनी उद्धव ठाकरेंना दिलाय.
नारायण राणेंचा सभेपूर्वीच ठाकरेंना इशारा
यावर ठाकरेंच्या पक्षाचे उमेदवार वैभव नाईक यांनी थेट राणेंनाच आव्हान दिलंय. “तुमचं वय झालं आहे. तुम्ही उगाच धमक्या देऊ नका. उद्धवजींना अडवण्याआधी आमचा सामना करावा लागेल. मग बघूया कोण कोणाला आडवतंय. नारायण राणे कितीही बोलले तरी ते आडवू शकत नाही.”, असं वैभव नाईक म्हणाले आहेत. (Narayan Rane)
उद्धव ठाकरेंच्या सभेला हजारो सिंधुदुर्गवासी हजेरी लावून त्यांचे विचार ऐकतील. या मतदारसंघांमध्ये उद्धवजींच्या शिवसेनेचे तिन्ही उमेदवार निवडून येतील, असा विश्वास देखील वैभव नाईक यांनी व्यक्त केलाय.सभेपूर्वीच राणेंनी इशारा दिल्याने सभेत आज उद्धव ठाकरे काय बोलणार, याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.
कोकणात ‘या’ 3 जागांवर होणार लढत
कणकवलीमध्ये नितेश राणे विरुद्ध संदेश पारकर लढत होईल. कुडाळ मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरे गटाचे वैभव नाईक विरुद्ध एकनाथ शिंदेंच्या पक्षात प्रवेश करणारे निलेश राणे अशी लढत होणार आहे. तर सावंतवाडीमध्ये विद्यमान मंत्री आणि एकनाथ शिंदे गटाचे दिपक केसरकर यांच्याविरुद्ध ठाकरे गटाकडून राजन तेली रिंगणात आहेत. (Narayan Rane)
News Title : Narayan Rane warning to Uddhav Thackeray
महत्वाच्या बातम्या –
“निवडणूक संपण्याची वाट बघतोय, नंतर..”; सुप्रिया सुळेंचा फडणवीसांना थेट इशारा
“..म्हणून पवारांनी अजितदादांना मुख्यमंत्री होऊ दिलं नाही”; भुजबळांचा गौप्यस्फोट
प्रेमात यश ते व्यवसायात भरभराटी, आज कुणाचं भाग्य उजळणार?; वाचा राशीभविष्य
‘आमदार नाही तर मंत्री म्हणून…’; संभाजी पाटील निलंगेकरांबद्दल गडकरींचं मोठं वक्तव्य
गद्दार शब्द ऐकताच एकनाथ शिंदे भडकले, रागात गाडीतून उतरले अन्…