‘…तर घर गाठणं कठिण होईल’, नारायण राणेंचा शरद पवारांना थेट इशारा
मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एकनाथ शिंदेंच्या बंडाळीवर अखेर मौन सोडलं आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडामागे भाजपचाच हात आहे, असा घणाघात शरद पवारांनी केला आहे.
इतकंच नाही तर बंड आमदारांना परिणाम भोगावे लागतील. त्यांना यायचं तर सभागृहातच आहे, असा इशारा शरद पवारांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिला होता. तर शरद पवारांच्या या वक्तव्यावरून भाजप नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जोरदार निशाणा साधला आहे.
शरद पवार साहेब या सर्वांना धमक्या देत आहेत. सभागृहात येऊन दाखवा, ते येणारंच आहेत, असं नारायण राणे म्हणाले. तर ते येणार आणि त्यांच्या मनाप्रमाणे मतदान करणार. त्यांच्या केसालाही धक्का लावल्यास घर गाठणे कठिण होईल, असा इशारा नारायण राणेंनी दिला आहे.
दरम्यान, आघाडी सरकार हे सोयीसाठी व स्वार्थासाठी झालेलं सरकार आहे. त्यामुळे कामाच्या व कार्याच्या बढाया मारू नये, असा टोला देखील नारायण राणेंनी लगावला आहे.
थोडक्यात बातम्या-
महिन्याभरानंतर केतकी चितळेची तुरूंगातून सुटका, बाहेर येताच म्हणाली…
खरंच चार्टर्ड प्लेनने आला होतात का?, ‘त्या’ फोटोंवर नितीन देशमुखांची प्रतिक्रिया
एकनाथ शिंदेंच्या बंडाळीवरून अजित पवारांचं भाजपला क्लिनचीट, म्हणाले…
‘घरचे दरवाजे उघडे आहेत, चर्चा होऊ शकते’; संजय राऊतांचं बंडखोर आमदारांना आवाहन
मोठी बातमी! आणखी दोन आमदार गुवाहाटीसाठी रवाना, शिवसेनेतील गळती कायम
Comments are closed.