नारायण राणेंच्या पत्नीने मुलांबद्दल व नवऱ्याबद्दल व्यक्त केली खंत!

Nilam Rane l विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात निलेश राणे आणि नितेश राणे हे मैदानात उतरले आहेत. मात्र आता स्वतःच्या मुलांच्या प्रचारासाठी नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे या देखील मैदानात उतरल्या आहेत. परंतु त्यांनी एका सभेदरम्यान मनातील खंत बोलून दाखवली आहे.

मला नारायण राणेंचा गर्व आहे :

यावेळी नीलम राणे म्हणाल्या की, “मला नारायण राणेंचा गर्व आहे. परंतु स्वभाव कुणाचे बदलता येत नाहीत. कारण मला ना नवऱ्याचा स्वभाव बदलता आला ना मुलांचा अशी खंत खासदार नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे यांनी देवगडमधील आयोजित सभेत व्यक्त केली आहे.

मात्र आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाल्याने प्रचाराचा धुराळा देखील उडताना दिसत आहे. मात्र आता एका सभेत नारायण राणेंच्या पत्नीच्या केलेल्या वक्तव्याने चर्चांना प्रचंड उधाण आले आहे.

Nilam Rane l दोन्ही राणेंना निवडणून द्या :

कणकवली देवगड विधानसभा मतदारसंघातील वैभववाडी आणि देवगड तालुक्यात महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी देवगड विधानसभा मतदारसंघातील सभेत नीलम राणे यांनी महिलांना संबोधित केले आहे. मात्र यावेळी त्यांनी नितेश राणे आणि निलेश राणे या दोघांनाही भरघोस मतांनी निवडून द्या असे आवाहन जनतेला केले आहे.

याशिवाय निलेश राणे व नितेश राणे यंदाच्या निवडणुकीत निवडून आल्यानंतर जर त्यांनी काम केले नाही तर आपण त्यांना प्रत्येक कामात विचारायचं. मग ते खासदार असो किंवा दोन्हीही आमदार असो. कारण आता ते दोघेही शांत झाले आहेत. कारण त्या दोघांनी देखील आता वयाची 40 शी ओलांडल्याचं म्हंटल आहे.

News Title – Narayan Rane Wife speech

महत्त्वाच्या बातम्या-

शरद पवारांचा सदाभाऊ खोतांना मोठा धक्का!

ऐन निवडणुकीत उद्धव ठाकरेंना धक्का, कल्याणमधील बड्या नेत्याने सोडली साथ

शिंदे गटाचे 8 आमदार, एक मंत्री ठाकरेंकडे परत येणार?

कॉँग्रेसकडून सर्वाधिक मुस्लिम उमेदवार मैदानात, भाजपने किती जणांना दिली संधी?

शरद पवारांनी गेम पलटवला! बड्या नेत्याला मोठा धक्का