विधान परिषदेची उमेदवारी नाही, तरीही राणे मंत्री होणार!

विधान परिषदेची उमेदवारी नाही, तरीही राणे मंत्री होणार!

मुंबई | महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे यांचा पत्ता कापून भाजपने विधान परिषदेसाठी प्रसाद लाड यांना उमेदवारी जाहीर केलीय. मात्र तरीही राणेंना येत्या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद मिळणार असल्याचं कळतंय. 

शिवसेनेचा नारायण राणेंबद्दलचा रोष पाहता हा निर्णय घेण्यात आला. मात्र राणेंना मंत्रिपद देऊन त्यांना 6 महिन्यात निवडून आणण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. 

येत्या जुलैमध्ये होणाऱ्या विधान परिषदेच्या 12 जागांमध्ये राणेंची वर्णी लागू शकते. तसं आश्वासन मुख्यमंत्र्यांकडून नारायण राणेंना देण्यात आल्याचं कळतंय. 

Google+ Linkedin