मुंबई | एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) बंडानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघालं होतं. यानंतर शिवसेना (Shivsena) कोणाची हा प्रश्न सर्वांसमोर उभा ठाकलाय. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असून याचा निकाल न्यायालयाने आणखी दिला नाही. अशात भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
नारायण राणेंनी सर्वोच्च न्यायालयाच्या (Suprime Court) निकालाआधी मोठी भविष्यवाणी केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
मी ज्योतिष सांगू का? कारण न्यायालयातील प्रकरणांवर मी कधी बोलत नाही. पण उद्धव ठाकरे ज्या चिन्हासाठी भांडत आहेत. ते चिन्ह जाईल. ते चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळेल. ही टाका ब्रेकिंग न्यूज, असं नारायण राणे यावेळी बोलले.
दरम्यान, अडीच वर्षांत शिवेसेनेने काय केलं? हे त्यांनी सांगावं. मातोश्री सोडून मंत्रालयात अडीच वर्षांत अडीच तास बसले. हे काय मुख्यमंत्री आहेत का?, असा सवालही नारायण राणेंनी विचारला आहे.
आम्ही मुलं जन्माला घातली मग नाव देण्याचा अधिकार कोणाला. आम्हालाच ना. महाराष्ट्रात विविध योजना आहेत. काल वंदे भारत एक्सप्रेम सुरू करण्यात आली. पंतप्रधानांना बोलावलं कारण पैसे ते देतात. त्यात का चुकीचंय, असा सवाल राणेंनी केला आहे.
कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या जागा आम्ही मोठ्या मताधिक्याने जिंकणार आहोत, असा विश्वास देखील नारायण राणेंनी यावेळी व्यक्त केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
- “आता राऊत आले की लोक टीव्हीच बंद करतात”
- अखेर राखीच्या राड्यानंतर आदिलच्या गर्लफ्रेंडनं दिलं प्रत्युत्तर
- ‘इतका’ वेळ मोबाईलचा वापर करत असाल तर आताच व्हा सावध, अन्यथा…
- अभिनेत्री प्रिया बेर्डेंनी सोडली राष्ट्रवादीची साथ; केला ‘या’ पक्षात प्रवेश
- लेकीच्या भविष्याची चिंता विसरा; 21 वर्षांची होताच मिळतील ‘इतके’ लाख