बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जामिनावर सुटताच नारायण राणेंचं पहिलं ट्विट, म्हणाले,

रायगड | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मोठा दिलासा मिळाला. न्यायदंडाधिकाऱ्यांकडून नारायण राणे यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. रत्नागिरी पोलिसांनी अटक करण्यापूर्वी राणे यांनी रत्नागिरी कोर्टात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र, रत्नागिरी कोर्टाने त्यांचा अर्ज फेटाळला होता.

मुंबई उच्च न्यायालयानेही या प्रकरणात तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिल्यानं राणेंचा आजचा मुक्काम पोलीस ठाण्यात होणार का? असा प्रश्न विचारला जात होता. मात्र, न्यायदंडाधिकाऱ्यांनी जामीन मंजूर केल्यामुळे राणे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

जामीन मंजूर करताना महाड कोर्टानं काही अटी घातल्या आहेत. राणे यांना 15 हजार रुपयाच्या जातमुचकल्यावर जामीन मंजूर करण्यात आला. जामिनावर सुटका होताच नारायण राणेंनी प्रतिक्रिया दिली आहे. जामिनावर बाहेर पडलेले नारायण राणे काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं. राणेंनी एक ट्विट करत यावर भाष्य केलंय. ‘सत्यमेव जयते’ असं दोन शब्दांचं ट्विट राणेंनी रात्री  केलं आहे.

दरम्यान, नारायण राणे यांच्या एका वक्तव्यामुळे अनेक चुकीच्या घटना घडल्या आहेत. राणेंचं वक्तव्य बेजबाबदारपणाचं आहे, असा युक्तिवाद सरकारी वकिलांकडून करण्यात आला आहे. महाड पोलिसांनी नरायण राणे यांची 7 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. मात्र, प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांनी सरकारी वकिलांची ही मागणी फेटाळून लावल्याचं पाहायला मिळत आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

बैलगाडा शर्यत सुरू करण्यासंदर्भात जयंत पाटलांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

आनंदाची बातमी! राज्यातील कोरोना रूग्णसंख्येत दिवसेंदिवस होतेय लक्षणीय घट

“भाजपला सत्तेची भूक आणि लालच असल्याने राणेंना केंद्रात मंत्रिपद”

वातावरण तापलं! शिवसेना खासदाराच्या घरावर उमटले राणेंच्या अटकेचे पडसाद!

सोन्या-चांदीला पुन्हा झळाळी, जाणुन घ्या आजचे दर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More