बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रेल्वे स्टेशनवर सापडला होता नारायण, MPSCतून बनला अधिकारी; बच्चू कडूंचंही योगदान!

अमरावती | राज्यमंत्री बच्चू कडूंना एक फोन आला, तो फोन कोणत्या कार्यकर्त्याचा, राजकीय क्षेत्रातला नव्हता. मात्र त्या फोन वरील संभाषणातून बच्चू कडूंना भरभरून आनंद झाला. कारण मागील अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या पाठपुराव्याची ती फलश्रुती होती. मुंबई येथील शासकीय निवासस्थानी कंत्राटी पद्धतीने मानधनावर काम करणाऱ्या नारायण या ‘अनाथ’ मुलाने बच्चू कडूंना फोन करत एमपीएससी परीक्षेतून ‘वनक्षेत्रपाल’ (गट- ब ) पदावर नियुक्ती झाल्याचं त्याने बच्चू कडूंना सांगितले.

नारायण इंगळे हा “अनाथ” आहे. नारायण मुळचा लातूरचा आहे तो लहानपणी पोलिसांना रेल्वे स्टेशनवर मिळाला. जालना येथील बाल न्यायालयाने त्याला रिमांड होम मध्ये ठेवले. लातुरला बाल सुधारगृह येथे पहिली ते दहावी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर परभणी येथे पॉलिटेक्निक शिक्षण पुर्ण केले. पुढील इंजिनीअरिंगचे शिक्षण औरंगाबादला समाज कल्याण होस्टेल मधून पुर्ण केले. एमपीएससीच्या अभ्यासाकरीता तो मागील दोन ते तीन वर्षापासून राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या शासकीय निवासस्थानी राहत होता व त्यांच्या कंत्राटी पध्दतीने मानधनावर काम करत होता. एमपीएससी परीक्षेच्या माध्यमातून हजारो मुलांची दरवर्षी निवड होत असते. परंतु नारायण यापेक्षा वेगळा आहे. नारायण हा अनाथ असल्याने परीक्षा भरती प्रक्रियेमध्ये त्याला नेहमी संघर्ष करावा लागत होता. यामुळं नारायण सारख्या आज हजारो विद्यार्थ्यांना अशा समस्यांशी सामना करावा लागत होता.

अनाथ मुलांच्या आरक्षणाकरीता ‘प्रहार’ चा लढा सुरू होता. अनाथांना आरक्षण जाहीर झाल्यानंतर नारायणने परीक्षा दिली आणि तो उत्तीर्ण देखील झाला. परंतु एमपीएससीच्या पर्सेटाईल पध्दतीमुळे तो पास होऊन देखील अपात्र ठरला. त्यानंतर मागील वर्षापासून राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आयोगासोबत पत्रव्यवहार करत बैठकी घेतल्या होत्या. परिणामी नियमात बदल झाल्यामुळंं अनाथ नारायणाला आपले स्वप्न साकार करता आलं आहे.

दरम्यान, हे यश केवळ एकट्या नारायणचं नसून महाराष्ट्रातील अनेक अनाथ मुलांचा मार्ग या निर्णयामुळं मोकळा झाला असून बच्चू कडूंच्या पाठपुराव्यातून आता अनाथांनाही यशाचा मार्ग सुकर झाल्याचं समाधान अनाथ मुला-मुलींमध्ये असून राज्यमंत्री बच्चू कडूंच्या प्रयत्नांची राज्यभर प्रशंसा होत आहे.

थोडक्यात बातम्या-

पुण्यातील उद्यानाच्या नावावरुन नवा वाद, ‘साध्वी’ शब्द हटवण्याची मागणी

मुंबईच्या कोरोना आकडेवारीत कमी अधिक प्रमाणात घट, वाचा आजची आकडेवारी

चिंताजनक! राज्यातील नव्या कोरोनाबाधितांचा आकडा वाढला, वाचा आकडेवारी

‘जर परमबीर सिंह भारताबाहेर गेले असतील तर’..; गृहमंत्र्यांनी दिली मोठी माहिती

‘गेल्या 5 ते 6 वर्षापासून कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवानी…’; सुशिल कुमार यांचा मोठा गौप्यस्फोट!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More