बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आरोपांकडे लक्ष देऊ नका, कामावर भर द्या- नरेंद्र मोदी

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मोठा धीर दिला आहे. तुम्ही आरोपांकडे लक्ष देऊ नका, तुमच्या कामावर भर द्या, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी गुरुवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

कोरोनावरून राजकारण करू नये म्हणून सर्व पक्षांना समजवा. कोरोना महामारीत राजकारण आणू नका म्हणून या लोकांना सांगा, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांना सांगितलं. यावर मोदींनी उद्धव ठाकरे यांना आरोपांकडे लक्ष देऊ नका, तुमच्या कामावर लक्ष द्या, असा सल्ला दिला. कोरोना रुग्णांची संख्या वाढली तरी तुम्ही चिंता करू नका. रुग्णांची संख्या वाढल्याने आपली कामगिरी खराब होतेय, असंही मोदी म्हणाले.

कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्यांमध्ये एकप्रकारची स्पर्धा सुरू झाली आहे. हे राज्य कोरोना रोखण्यात अपयशी ठरत आहे तर ते राज्य कोरोना रोखण्यात यशस्वी होत आहे. अशा प्रकारची तुलना होत आहे. एकमेकांची तुलना करण्याची राज्यांमध्ये सध्या फॅशन सुरू झाली आहे. ती बंद करा, असं मोदी म्हणाले.

मी आताही तुम्हाला टेस्टिंग वाढवण्यावर भर देण्याचा सल्ला देईन. संक्रमितांची संख्या वाढल्याने आपली कामगिरी खराब आहे, असा विचार करण्याची गरज नाही. तुम्ही टेस्टिंग वाढवली तर तुमची रुग्ण संख्या वाढताना दिसणारच, अशा शब्दात मोदींनी उद्धव ठाकरेंना आश्वस्त केलं.

थोडक्यात बातम्या- 

” उद्धव ठाकरेंना 40 दिवसांमध्ये मुख्यमंत्रीपद सोडावं लागेल”

जम्बो कोविड सेंटर खासगी रुग्णालयांनी दत्तक घ्यावेत- उद्धव ठाकरे

महाराष्ट्र कडक लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर, राज्य सरकार कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत

धक्कादायक! ‘या’ काँग्रेस आमदाराचं कोरोनामुळे निधन

डिविलिअर्सच्या झंझावातापुढे मुंबई निष्प्रभ, अटीतटीच्या सामन्यात RCBचा विजय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More