देश

अयोध्या प्रकरणी कोणत्याही मंत्र्याने विनाकारण वक्तव्य करु नये; पंतप्रधानांचे आदेश

नवी दिल्ली | राम मंदिर-बाबरी मशीद वादग्रस्त प्रकरणाचा निकाल 17 नोव्हेंबरपर्यंत लागण्याची शक्यता आहे.  त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्र्यांना अयोध्या प्रकरणी विनाकारण कोणतेही वादग्रस्त वक्तव्य करु नये, असे आदेश दिले आहेत.

देशात सर्वात अतिसंवेदनशील असं अयोध्या प्रकरण आहे. गेल्या चाळीस दिवसात या प्रकरणाची जलद सुनावणी घेण्यात आली होती. आता 7-8 दिवसात या प्रकरणाचा निकाल लागणार आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देतं याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं आहे.

देशात शांततेचं वातावरण ठेवा. सर्वोच्च न्यायालय जो निर्णय देईल त्याचा आदर ठेवा, असं आवाहन नरेंद्र मोदी यांनी यापूर्वी जनतेला केलं होतं. कोणताही अनुचीत प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे.

दरम्यान, सरन्यायाधीश रंजन गोगोई 17 नोव्हेंबरला निवृत्त होणार आहेत. त्यामुळे निवृत्तीपूर्वी गोगोई 30 वर्षापासून प्रलंबीत असलेल्या प्रकरणाचा निकाल लावतात का हे पाहावं लागेल.

महत्त्वाच्या बातम्या- 

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या