बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पाकिस्तानला 10 दिवसांत धूळ चारू- पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली | भारताकडून शेजारी देश एक नाही तर तीन-तीन युद्ध हरले आहेत. हे शेजारच्या देशाला चांगलंच माहित आहे. भारतीय देशाला वाटलं तर भारत एक आठवडा किंवा दहा दिवसातच त्यांना हरवू शकतो, असं म्हणत मोदींनी पाकिस्तानचा नामोल्लेख न करता पाकिस्तानला इशारा दिला आहे. ते दिल्लीत एनसीसी कॅडेट्सना संबोधित करताना बोलत होते.

अनेक दशकांपासून शेजारी देश भारताविरोधात छुपे युद्ध करत आहे. यात अनेक नागरिकांना जीव गमवावा लागला आहे त्यासोबत आमचे जवानही शहीद होत झाले आहेत. त्यांनी आता हे बंद करावं नाहीतर भारतीय सैन्यानं ठरवलं तर तुम्हाला पराभूत करायला दहा दिवसही खूप झाले, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

आधीच्या सरकारांनी कैक दशकांपासून संसदेत नागरिकत्व दुरुस्ती कायदा रखडवला आणि व्होटबँकेचं राजकारण करत राहिले, असा आरोपही मोदींनी काँग्रेस, बसपसह विरोधी पक्षांवर केला.

दरम्यान, मोदी आपल्या प्रतिष्ठेसाठी जन्माला आला नाही. देश सगळं काही पाहत आहे. समजत आहे. गप्प आहे, पण त्यांना सगळं काही समजत आहे, असंही मोदींनी म्हटलं आहे.

 

ट्रेंडिंग बातम्या-

“गडकरीजी…आपण एका गाडीत बसलो नाही तरी एकाच स्टेशनवर एकत्र आलो”

अजित पवार मुख्यमंत्री असल्यासारखे वागतात; चंद्रकांत पाटलांचं टीकास्त्र

महत्वाच्या बातम्या-

पर्यावरणाविषयी बोलताना दिया मिर्झा ढसाढसा रडली!

सत्ता असताना गोट्या खेळत होता का?- इम्तियाज जलील

कोणी म्हटलं म्हणून सरकार बरखास्त होत नाही- बाळासाहेब थोरात

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More