मुंबई | भारतातल्या जनतेने पुन्हा एकदा नरेंद्र मोदींना आशीर्वाद दिले आहेत. उज्वल भूतकाळापेक्षा उज्वल भविष्यकाळ… हाच तो आशीर्वाद आहे. मोदींसमोर संपूर्ण विरोधक पाला-पाचोळ्यासारखे उडून गेले. मोदींनी इतिहास घडविला… त्यांंचं मनापासून अभिनंदन, अशी शब्दफुलांची उधळण आजच्या सामनाच्या अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली आहे.
लोकांनी ठरवले आणि मोदींनाच पुन्हा पंतप्रधान केलं. मोदी हेच देशाचे भाग्यविधाते आहेत. मिळालेले यश मोदींच्या लोकप्रियतेचे आणि अमित शहांच्या राजकीय व्यवस्थापन कौशल्याचे आहे, अशी स्तुती शिवसेनेने मोदी-शहा जोडगोळीची केली आहे.
देशाच्या जनतेने पुन्हा एकदा चौकीदारावर विश्वास राखला. आणि त्यांनाच चौकीदार म्हणून कायम राखले, असं शिवसेनेने म्हटलंय.
भलेभले विरोधक तोंडावर पडले. बुरूज ढासळले… आणि गड खालसा केले अशी अवस्था विरोधकांची झाली आहे, असं देखील शिवसेनेने म्हटलंय.
महत्वाच्या बातम्या
-प्रचारातली जुगलबंदी विसरुन शिवतारेंनी दाखवला दिलदारपणा!
-शिवसेनेच्या संभाव्य 4 केंद्रीय मंत्र्यांचा दारुण पराभव
-मनोरंजन आणि क्रिडा क्षेत्रातील भाजपचे ‘हे’ उमेदवार झाले विजयी
–मुंबईत महायुतीची बाजी; काँग्रेस राष्ट्रवादी भुईसपाट
-जळगावात उन्मेश पाटील 4 लाख 8 हजार विक्रमी मतांनी विजयी
Comments are closed.