नेहरूंमुळेच चहावाला पंतप्रधान झाला म्हणणाऱ्यांना मोदींचं उत्तर

रायपूर | माजी पंतप्रधान  जवाहरलाल नेहरू यांच्यामुळेच चहा विकणारा पंतप्रधान होऊ शकला, असं म्हणणाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिलं आहे.

ज्यावेळी मी पंतप्रधान झालो तेव्हा काँग्रेसवाले म्हणत होते की, चहावाला कसा काय पंतप्रधान होऊ शकतो. मात्र आता हेच लोक म्हणतात की, मी नेहरूमुळे पंतप्रधान झालो आहे.

काँग्रेसवाले मला चार वर्षाचा हिशोब मागत आहेत, मात्र त्यांच्या चार पिढ्या सत्तेत होत्या त्यांनी अगोदर सत्तर वर्षांचा हिशोब द्यावा, असंही ते म्हणाले.

दरम्यान, काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी एका कार्यक्रमावेळी नेहरूमुळेच चहावाला पंतप्रधान झाला, असं वक्तव्य केलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या-

-तुरूंगात असताना भाजपनं तुम्हाला तिकीट दिलं अन् निवडून आणलं!

-तृप्ती देसाई यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी!

-1 जानेवारीपासून पुण्यात हेल्मेटसक्ती!

-फक्त ‘भारतमाता की जय’ बोलणे म्हणजे राष्ट्रप्रेम नाही!

-दीपिका आणि रणवीरच्या लग्नाला शुभेच्छा देण्यासाठी मला वेळ नाही!