बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

5 एप्रिलला मला तुमची 9 मिनिटे द्या, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील 9 मुद्दे

नवी दिल्ली |कोरोनाग्रस्त बांधवांना आपल्याला प्रकाशाच्या वाटेवर न्यायचं आहे. त्यासाठी या रविवारी प्रकाशाची ताकद दाखवायची आहे. रविवारी 5 एप्रिलला रात्री 9 वाजता मला तुमचे 9 मिनिट द्या, घरातील सर्व दिवे बंद करा आणि बाल्कनीत उभे राहून 9 मिनिट मेणबत्ती, मोबाईल टॉर्च लावा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं.

कोणालाही कुठेही एकत्र जमायचं नाही, रस्ते, गल्ली इथे जायचं नाही, सोशल डिस्टन्सिंगची लक्ष्मणरेषा पार करायची नाही, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

अंध:काराला प्रकाशाची ताकद दाखवत आपण एकटं नाही आहोत हे दाखवून द्यायचं आहे, असं म्हणत पाठीमागचा जनता कर्फ्यू जसा यशस्वी केला आणि आपण इतर देशांना जसा आदर्श दिला तसं यावेळीही आपण 5 एप्रिलला घराबाहेर दिवा लावून प्रकाशाची ताकद दाखवूया, असं मोदी म्हणाले आहेत.

दरम्यान, ही मोठी लढाई मी एकटा कसा लढणार, किती दिवस असे घालवायचे हा प्रश्न तुम्हाला पडत असेल, पण आपण एकटे नाही, 130 कोटी देशवासीयांची सामूहिक शक्ती प्रत्येकाच्या सोबत आहे त्यामुळे काळजीचं कोणतंही कारण नाही, असं मोदी म्हणाले.

मोदींच्या भाषणातील 9 मुद्दे

1. 5 एप्रिलला प्रकाशाची शक्ती दाखवून देऊ
2. येत्या रविवारी रात्री 9 वाजता 9 मिनिटांसाठी घरातील सर्व दिवे बंद करा
3. दिवे बंद करुन मेणबत्ती, दिवा, टॉर्च, मोबाईल बॅटरी लावा
4. 9 मिनिटांनंतर एकेक दिवा लावताना प्रकाशाची शक्ती दिसेल
5. दिवे पु्न्हा लावताना संकल्प करा, आपण एकटे नाही
6. आपण 130 कोटी जनतेची शक्ती दाखवून देऊ
7. कोरोनाच्या अंधकारमय संकटावर प्रकाशाने मात करु
8. प्रकाशशक्ती दाखवताना एकत्र येऊ नका
9. सोशल डिस्टन्सिंग ठेवूनच कोरोनाची साखळी तोडू या

 

ट्रेंडिंग बातम्या-

‘मरण्यासाठी मशिदीपेक्षा चांगली जागा नाही’ असं म्हणणारे मौलाना साद आता म्हणतात…

दिल्लीसारखा महाराष्ट्रातही होणार होता तबलिगीचा कार्यक्रम; गृह विभागाच्या सतर्कतेनं धोका टळला

महत्वाच्या बातम्या-

“लॉकडाउन संपेपर्यंत झोपडपट्टी आणि चाळींमधल्या लोकांना स्थलांतरित करा”

सोलापुरातील दगडफोड्याच्या पोराची जिद्द; परिस्थितीवर मात करत झाला DYSP

14 एप्रिलला लॉकडाऊन संपणार का? आरोग्य मंत्री म्हणतात…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More