…फक्त मोर्चे काढून जनतेचं समर्थन मिळत नाही- नरेंद्र मोदी

नवी दिल्ली | फक्त मोर्चे काढून जनतेचं समर्थन मिळत नाही, आयुष्यात बदल घडवून आणण्यासाठी आपल्यासोबत कोण आहे, हे हल्ली लोक पाहतात, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. 

संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये आयोजित राष्ट्रीय लोकप्रतिनिधींच्या बैठकीत ते बोलत होते. केंद्रीय मंत्री,  विविध राज्यांचे मुख्यमंत्री, अधिकारी, आमदार आणि खासदार यावेळी उपस्थित होते.

एकेकाळी देशात फक्त राजकारण केलं जायचं. आता काळ बदलला आहे. तुम्ही सत्तेत असा किंवा विरोधी पक्षात लोकांसाठी काय करता हे महत्त्वाचं आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या