बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जगातील सर्वात लोकप्रिय नेते ठरले नरेंद्र मोदी; जो बायडन यांनाही टाकलं मागे

नवी दिल्ली | पंतप्रधान मोदींच्या लोकप्रियतेचा पुन्हा एकदा सातासमुद्रापारही डंका वाजला आहे. जगभरातील राष्ट्रप्रमुखांना मागे टाकत पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा विश्वनेते बनले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अप्रूव्हल रेटिंग हे 75 टक्के इतके आहे. या यादीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे 41 टक्के रेटिंगसह 11 व्या स्थानी आहेत. या रिपोर्टनुसार दुसऱ्या नंबरवर मेक्सिकोचे (Mexico)राष्ट्रपती आंद्रेस मेनुएल लोपेज ओब्रोडोर आहेत.

तिसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान एँथोनी अल्बेनेस राहिले. त्यांना 58 टक्के जणांनी पसंती दिली. हा सर्वे या वर्षी 17 ऑगस्ट ते 23 ऑगस्टच्या काळात करण्यात आला.

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More