नवी दिल्ली | जगातील लोकप्रिय नेत्यांच्या यादीत (List) पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी पहिलं स्थान पटकावलं आहे. अमेरिकन डेटा इंटेलिजन्स फर्म ‘द मॉर्निंग कन्सल्ट’च्या सर्वेक्षणानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अप्रूव्हल रेटिंगमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन आणि यूकेचे पंतप्रधान ऋषी सुनक (Rishi Sunak) यांच्यासह 22 देशांच्या नेत्यांना मागे टाकले आहे.
पीएम मोदींचे अप्रूव्हल रेटिंग 78% आहे. या यादीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन 40% रेटिंगसह 7व्या क्रमांकावर आहेत. गेल्या वेळी ते 11व्या क्रमांकावर होते. तर ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक हे 16व्या स्थानावर आहेत.
‘मॉर्निंग कन्सल्ट’चं हे रेटिंग 26 जानेवारी ते 31 जानेवारी दरम्यानचं आहे. या यादीत ब्राझीलचे राष्ट्रपती लुला डी सिल्वा या यादीत 50 टक्के रेटिंगसह 5 व्या क्रमांकावर आहेत. तसेच अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन सहाव्या क्रमांकावर आहेत.
पीएम मोदी गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने या रेटिंग लिस्टमध्ये टॉपवर आहेत. मे 2020 मध्ये 84% लोकप्रियतेसह मोदी या यादीत अग्रस्थानी होते.
2021 मध्ये मोदींना पुन्हा सर्वात चर्चित आणि लोकप्रिय नेत्याचा दर्जा मिळाला. या सर्वेक्षणात पीएम मोदींचे अप्रूव्हल रेटिंग 70 टक्के होतं.
महत्त्वाच्या बातम्या-