“लोकसभा निकालानंतर 6 महिन्यातच राजकीय..”; PM मोदींचा सर्वात मोठा दावा

Narendra Modi | येत्या 1 जून रोजी लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. देशभरातील जवळपास 54 मतदारसंघात हे मतदान होणार आहे. तर 4 जून रोजी लोकसभेचा निकाल लागेल. या निकालाकडे संपूर्ण देशाचं तसंच नेत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे .

देशात भाजपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात 400 पारचा नारा दिलाय. भाजपाने बऱ्याच ठिकाणी आघाड्या केल्या आहेत. त्यामुळे भाजपला 400 जागा मिळतील की निकाल काहीसा वेगळाच येईल, हे आता 4 जून नंतरच पाहायला मिळेल. मात्र, त्यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वात मोठा दावा केलाय.  नरेंद्र मोदी (Narendra Modi ) यांनी निकालानंतर सहा महिन्यातच राजकीय भूकंप होणार  असल्याची भविष्यवाणी केली आहे.

“घराणेशाहीच्या राजकारणावर अवलंबून असलेले..”

मोदींच्या या भविष्यवाणीमुळे खळबळ उडाली आहे. नरेंद्र मोदींच्या या विधानाचा विरोधकांनी देखील धसका घेतल्याचं दिसत आहे.  बंगालमध्ये एका ठिकाणी बोलताना नरेंद्र मोदींनी मोठं भाष्य केलं आहे.  भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी मोदी बंगालमध्ये आले होते. यावेळी त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधत टीका केली.

“ममता बॅनर्जी यांचं संपूर्ण लक्ष फक्त लोकसंख्या बदलण्यामध्येच आहे. पण तुमचं एक मत हे देशाची दिशा ठरवू शकतं. 4 जूननंतर येत्या 6 महिन्यात मोठा राजकीय भूकंप होणार आहे. घराणेशाहीच्या राजकारणावर अवलंबून असलेले अनेक राजकीय पक्ष आपसूकच कोसळतील. त्यांचेच कार्यकर्ते आता थकले आहेत.”, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय.  यावेळी मोदी (Narendra Modi ) यांनी नेमकं कोणत्या पक्षाबद्दल भाष्य केलं याबाबत त्यांनी उघडपणे असं काहीच सांगितलं नाहीये. त्यामुळे राजकीय वर्तुळात आता वेगवेगळ्या तर्क-वितर्काला उधाण आलं आहे.

ममता बॅनर्जी यांच्यावर मोदींची टीका

पुढे बोलताना मोदी म्हणाले की, “ममता बॅनर्जी यांचं सरकार तुष्टीकरणाचं राजकारण करते, येथे संतांवर हल्ले होतात. याशिवाय केंद्रीय योजनाही बंद केल्या जात आहेत. बंगालमध्ये घुसखोरी झपाट्याने वाढत आहे. या लोकांना बंगालमध्ये घुसखोरांनी येऊन स्थायिक व्हावे असं वाटतेय.”, अशी टीका यावेळी मोदी यांनी केली.

दरम्यान, बंगालमधील लोकसभेच्या 9 जागांवर 1 जून रोजी मतदान होणार आहे. 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने बंगालमध्ये 18 जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे भाजपला येथून 18 पेक्षा अधिक जागांची आशा असेल. लोकसभा निवडणुकीतील बंगालमधील ही माझी शेवटची रॅली असल्याचं यावेळी मोदी (Narendra Modi ) यांनी सांगितलं.

News Title –  Narendra Modi Biggest Prediction on political

महत्वाच्या बातम्या-

पुणे अपघात प्रकरणात ट्विस्ट; ‘मी शांत बसणार नाही, सगळी नावं..’, अटकेत असलेल्या डॉक्टरचा मोठा इशारा

“…याचा अर्थ असा होत नाही की मी इस्लामचा स्वीकार करेल”, गौरी खानचं मोठं वक्तव्य

‘ब्लड सॅम्पल बदलणाऱ्या डॉक्टरच्या…’; सुषमा अंधारेंचा खळबळजनक दावा

स्वतःच्या घरातील 8 जणांना कुऱ्हाडीने… बातमी वाचून काळजाचा थरकाप उडेल

HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी सर्वात मोठी बातमी, ‘या’ सेवेत बँकेकडून मोठा बदल