PM मोदींचा आज वाढदिवस, 600 हून अधिक भेटवस्तूंचा होणार लिलाव

Narendra Modi Birthday | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 17 सप्टेंबररोजी वाढदिवस आहे. आज ते आपला 74 वा वाढदिवस साजरा करत आहेत. देशभरातून मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक धाडसी निर्णय घेतले आहेत. त्यामुळे दूरदृष्टी असलेला पंतप्रधान अशी त्यांची ओळख निर्माण झाली.याचबरोबर अनेक राष्ट्रप्रमुखांशी त्यांच्या मैत्रीपूर्ण संबधामुळे मोदी हे आज जागतिक नेते म्हणून देखील ओळखले जातात. (Narendra Modi Birthday)

आज पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळालेल्या 600 हून अधिक भेटवस्तूंचा त्यांच्या वाढदिवसानिमित्त लिलाव होणार आहे. भेटवस्तूंची मुळ किंमत सरकारी समिती ठरवत असते. या भेटवस्तूंची किंमत 600 पासून ते 8.26 लाख रुपयांपर्यंत आहे. हा लिलाव 2 ऑक्टोबरपर्यंत असणार आहे. सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी ही माहिती दिली आहे.

पंतप्रधान मोदींचा आज वाढदिवस

पॅरालिम्पिक पदक विजेत्यांचे शूज आणि इतर गोष्टींपासून ते राम मंदिराच्या प्रतिकृतीपर्यंत अशा अनेक गोष्टींचा यात समावेश आहे. गजेंद्र सिंह शेखावत यांनी सोमवारी नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टला भेट दिली. येथे पंतप्रधान मोदींना मिळालेल्या भेटवस्तूंचे प्रदर्शन लावण्यात आले आहे. यादरम्यान त्यांनी लिलावाबाबत माहिती दिली. (Narendra Modi Birthday)

यंदा हा सहावा लिलाव असणार आहे. मिळालेल्या भेटवस्तूंचा लिलाव करुन त्यातून मिळणाऱ्या पैशांचा वापर गंगा स्वच्छ करण्यासाठी गुंतवला जातो. यावर्षी देखील मिळालेली रक्कम राष्ट्रीय गंगा निधीला दान केली जाणार आहे.

लिलावात कोणत्या वस्तूंचा समावेश?

मोदींना मिळालेल्या भेटवस्तूमध्ये पॅरालिम्पिक कांस्यपदक विजेते नित्या श्रीशिवन आणि सुकांत कदम यांचे बॅडमिंटन रॅकेट आणि रौप्य पदक विजेता योगेश खातुनियाचे डिस्कस आहेत. त्यांची मूळ किंमत सुमारे 5.50 लाख आहे. तसेच रौप्य पदक विजेता शरद कुमार यांनी स्वाक्षरी केलेल्या टोपीची मूळ किंमत सुमारे 2.86 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. (Narendra Modi Birthday)

याव्यतिरिक्त राम मंदिराची प्रतिकृती देखील लिलावासाठी ठेवण्यात आली आहे. त्याची मूळ किंमत 5.50 लाख रुपये आहे. मोराची मूर्तीही आहे. त्याची मूळ किंमत 3.30 लाख रुपये आहे. तसेच चांदीच्या वीणाची किंमत 1.65 लाख रुपये आहे. यासह अनेक भेटवस्तू आहेत, ज्याचा आज 17 सप्टेंबररोजी पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी लिलाव केला जाईल.

News Title : Narendra Modi Birthday Auction of 600 gifts

महत्वाच्या बातम्या –

..तर बंद होऊ शकते खाते; सुकन्या समृद्धी योजनेत झाला महत्वाचा बदल

आज अनंत चतुर्दशी, ‘या’ राशींवर राहणार गणपती बाप्पाची कृपा!

ईशा देओलकडून खुलासा म्हणाली, ‘सेक्सबदल मला….’

दीपिकाचा लेकीसोबतचा पहिला फोटो सोशल मीडियावर व्हायरल!

पितृ पक्षात ‘या’ गोष्टी करा; होतील सर्व इच्छा पूर्ण