Top News

पंतप्रधान मोदींच्या पुस्तकावर बंदी आणा; मराठा समाजाचं मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई | ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी ‘ या पुस्तकावरून सध्या वादंग निर्माण झाला असून ठाण्यातील मराठा आणि बहुजन समाजाच्या नेत्यांनी देखील या पुस्तकाच्या विरोधात दंड थोपटले आहेत . हे पुस्तक कोणत्याही ठिकाणी विक्रीसाठी ठेवण्यात येऊ नये, जर असं झाल्यास कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असा इशाराच या नेत्यांनी दिला आहे.

सकल मराठा समाजाच्या वतीने यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील पत्र देण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांना दिलेल्या या पत्रात मराठा समाजाच्या वतीने हा इशारा देण्यात आलाय. त्यामळे या पुस्तकावरून येत्या काही काळात ठाण्यात देखील वातावरण चांगलेच तापण्याची चिन्हं आहेत.

नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना करणाऱ्या ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ पुस्तकावरून वाद सुरू आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने हा मुद्दा उचलण्यात असून यामुळे वातारण चांगलेच तापलं आहे.

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना मोदींसोबत करणं म्हणजे हा केवळ अपराधच नव्हे तर, महाराष्टाची माती कलंकित करण्यासारखं आहे, असं मराठा समाजाने मुख्यमंत्र्यांना पत्रात सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या