उद्धव ठाकरेंना फोन करून नरेंद्र मोदींनी केली रश्मी ठाकरेंच्या तब्येतीची विचारपूस!
मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन करून रश्मी ठाकरे यांच्या तब्येतीची विचारपूस केल्याची माहिती समोर आली आहे. नरेंद्र मोदींनी फोन करून रश्मी ठाकरेंना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्याचं कळतंय.
रश्मी ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली असून त्या मुंबईच्या एच.एन. रिलायन्स रूग्णालयात उपचार घेत आहेत. मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावरच त्यांनी स्वत: ला क्वारंटाईन करुन घेतलं होतं. मात्र रश्मी ठाकरे यांना दोन दिवसांपूर्वी HN रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
नरेंद्र मोदींनी फोन करून रश्मी ठाकरेंच्या प्रकृतीची चौकशी केल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. तसेच नरेंद्र मोदी यांनी रश्मी ठाकरे यांना केलेल्या फोनमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. याआधी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. आदित्य ठाकरे यांनी स्वत: ट्विटरवर याबाबत माहिती दिली होती.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना पोटदुखी आणि पित्ताशयाच्या त्रासामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ते सध्या मुंबईतील ब्रीच कॅंडी रूग्णालयात उपचार घेत आहेत. तसेच शरद पवारांवर बुधवारी शस्त्रक्रिया पार पडली असून त्यांची प्रकृती सध्या चांगली असल्याची माहिती आहे.
थोडक्यात बातम्या-
केंद्र सरकारचा सर्वसामान्यांना मोठा दिलासा; ‘हा’ निर्णय घेतला मागे
आमचा पक्ष भाजपसारखा नाही, दिलेली आश्वासने पाळण्याचा काँग्रेसचा इतिहास आहे- राहुल गांधी
“देवेंद्र फडणवीसांनी फालतू राजकारण करणं सोडून द्यायला हवं”
शरद पवारांच्या आजारपणावरून टीका करणाऱ्या भाजप नेत्यांना शंभुराज देसाईंनी झापलं, म्हणाले…
रवी शास्त्रींनी घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट!
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.