बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“नरेंद्र मोदींना वाटेल तेव्हा ते पाकिस्तानचं क्रिकेट बंद करू शकतात”

मुंबई | गेल्या काही वर्षात पाकिस्तान आर्थिक कचाट्यात सापडला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय संस्थांकडे पाकिस्तानला मदत मागावी लागत आहे. अशातच कोरोना काळात पाकिस्तानचं कंबरडंच मोडलं. तर अनेक देशांनी पाकिस्तान क्रिकेट खेळण्यास मनाई केली आहे. अशातच आता नवनिर्वाचित अध्यक्ष रमीज राजा यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला 50 टक्के निधी हा आयसीसीकडून येतो. तर आयसीसीचा 90 टक्के निधी हा बीसीसीआयकडून येतो. म्हणजेच पाकिस्तानचं क्रिकेट हे भारतीयांच्या पैशांवर सुरू आहे, असं रमीज राजा यांनी म्हटलं आहे. नरेंद्र मोदींना वाटेल तेव्हा पाकिस्तानचं क्रिकेट बंद करू शकतात, असंही रमीज राजा म्हणाले आहेत.

पाकिस्तानला आता आयसीसीवरील अवलंबित्व कमी करण्याची वेळ आली असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांंगितलं आहे. जर पंतप्रधान मोदींनी आयसीसीचा निधी थांबवला तर पाकिस्तान क्रिकेट बंद पडेल, असंही ते यावेळी म्हणाले आहेत. रमीज राजा यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भाजप आयटीसेलचे प्रमुख अमित मालविय यांनी हा व्हिडीओ ट्विट केला आहे.

दरम्यान, जोपर्यंत नरेंद्र मोदी सत्तेत आहेत, तोपर्यंत भारत आणि पाकिस्तानमध्ये एकही क्रिकेटचा सामना होणार नाही, असं पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शाहिद आफ्रीदीनं म्हटलं होतं.

पाहा व्हि़डीओ-

थोडक्यात बातम्या-

छोटा पॅकेट बडा धमाका, इशान किशनचा धुमधडाका, इतक्या चेंडूतच पठ्ठ्याने ठोकलं अर्धशतक!

मोदी सरकारला मोठा धक्का! मुख्य आर्थिक सल्लागार के सुब्रमण्यम यांचा राजीनामा

चिपी विमानतळाच्या उद्घाटनावर भाजपचा बहिष्कार; राणेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल!

‘सोशल मीडिया हे भ्याड लोकांचं ठिकाण, आक्षेपार्ह कृत्य करणाऱ्यांना…’; पंतप्रधान संतापले!

“तुम्ही चोऱ्या केल्या नसत्या तर आम्ही धाडी टाकल्या असत्या का?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More