Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी एका प्रचार सभेत कॉँग्रेसवर निशाणा साधत मुस्लिम आरक्षणाबाबत एक वक्तव्य केलं होतं. तसंच काँग्रेस सत्तेत आली तर महिलांचे मंगळसूत्र गहाण ठेवले जातील, असंही मोदी म्हणाले होते. त्यांच्या या विधानानंतर बराच वाद झाला.
काँग्रेससह विरोधी पक्षांनी मोदी यांच्या या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला होता. आता त्यांनी नुकतीच एक मुलाखत दिली. यामध्ये मोदी यांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं. तसंच या दरम्यान त्यांनी एक दावा देखील केला.
‘हिंदू-मुस्लीम असा भेद..’
“मला विश्वास आहे की माझ्या देशातील जनता मला मतदान करेल. ज्या दिवशी मी हिंदू-मुस्लिम करेल, त्या दिवशी मी सार्वजनिक जीवनात राहण्यास योग्य राहणार नाही. हिंदू-मुस्लीम असा भेद करायचा नाही, हा माझा संकल्प आहे.”, असं नरेंद्र मोदी (Narendra Modi ) म्हणाले आहेत.
पुढे बोलताना मोदी म्हणाले की, मी जास्त मुलं असलेल्यांना असा उल्लेख केला त्यामध्ये हिंदू अथवा मुस्लीम, असे काहीही म्हटले नव्हते. माझं इतकंच म्हणणं आहे की, तुम्ही जितक्या मुलांचं पालनपोषण करु शकतात, तितकीच मुलं जन्माला घाला. तुमच्या मुलांचा सांभाळ करण्यासाठी सरकारची मदत घ्यावी लागेल, अशी वेळ येऊ देऊ नका, असं मोदी यांनी स्पष्ट केलं.
मोदी नेमकं काय म्हणाले होते?
एका सभेत मोदी यांनी आरक्षणाबाबत मोठं वक्तव्य केलं होतं. “मी जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारावर आरक्षण मिळू देणार नाही. तसंच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि ओबीसी यांच्या आरक्षणाला कोणत्याही परिस्थितीत धक्का लागू देणार नाही.”, असं नरेंद्र मोदी (Narendra Modi ) म्हणाले होते.
तसंच कॉँग्रेसचे घोषणा पत्र हे मुस्लिम लीग सारखे दिसत असल्याचं देखील मोदी यांनी म्हटलं होतं. अगोदर जेव्हा कॉँग्रेसची सत्ता आली होती, तेव्हा त्यांनी देशाच्या संपत्तीवर मुस्लिमांचा हक्क असल्याचं सांगितलं होतं. म्हणजेच, कॉँग्रेस तुमची संपत्ती यांना वाटणार, असा आरोप नरेंद्र मोदी यांनी केला होता.
News Title- Narendra Modi clarification on his statement about Hindu-Muslim
महत्वाच्या बातम्या-
बापरे! 72 तासांत 8 किलो सोने, 14 कोटी रोकडसह 170 कोटींची मालमत्ता जप्त; कोण आहे मालक
मोदींपेक्षाही कंगना रनौत श्रीमंत; संपत्तीचा आकडा वाचून हैराण व्हाल
पंतप्रधान नरेंद्र मोदींची एकूण संपत्ती किती? आकडेवारी एकूण व्हाल थक्क
राखी सावंतची प्रकृती खालावली; ‘या’ आजाराने त्रस्त
तुम्हीही चहा-कॉफीचे शौकीन आहात, सावधान! शास्त्रज्ञांनी दिला भयंकर इशारा