Top News

राजीव गांधींवरील वक्तव्याप्रकरणी नरेंद्र मोदींना क्लीन चिट

नवी दिल्ली | माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचं सांगत काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी निवडणूक आयोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना क्लीन चिट दिली आहे.

नरेंद्र मोदींनी केलेल्या वक्तव्यामुळे आचारसंहितेचा भंग झालेला नाही, असं सांगत निवडणूक आयोगाने प्रकरण निकाली काढलं आहे.

माजी पंतप्रधान राजीव गांधी मिस्टर क्लीन असं बिरूद मिरवत, मात्र तुमच्या वडिलांचा शेवट भ्रष्टाचारी नंबर वनच्या रूपात झाला होता, असं वक्तव्य नरेंद्र मोदी यांनी केलं होतं.

दरम्यान, राहुल गांधींनी याप्रकरणी मोदींवर टीका केली आहे. तसेच मोदींना आत्तापर्यंत एकूण 9 तक्रारींमध्ये निवडणूक आयोगाकडून क्लीन चिट मिळाली आहे.

महत्वाच्या बातम्या

-अशोक चव्हाण ‘आदर्श’चा बदला काँग्रेस पक्ष संपवून घेत आहेत- नितेश राणे

-नरेंद्र मोदींना आत्तार्यंत कोणकोणत्या प्रकरणी मिळालं क्लीन चीट!

-केंद्राकडून दुष्काळ निवारणासाठी महाराष्ट्राला आणखी 2160 कोटी रूपयांची मदत

-फाईनलचं तिकीट कोण मिळवणार? पहिला क्वालिफायर सामना आज

-DYSP च्या निष्काळजीपणामुळे 16 जवानांचा मृत्यू; वीरपत्नीचा गंभीर आरोप

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या