पुणे महाराष्ट्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 नोव्हेंबरला पुणे दौऱ्यावर, सिरम इन्स्टिट्यूला भेट देणार

पुणे | ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि सिरम इन्स्टिट्यूटकडून निर्माण केली जाणारी कोविडशिल्ड ही लस अंतिम टप्प्यात असल्याचं सिरमचे अदर पुनावाला यांनी सांगितलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 नोव्हेंबरला पुणे दौऱ्यावर आहेत आणि ते सिरम इन्स्टिट्यूटला भेट देऊन लसीच्या प्रगतीचा आढावा घेणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 28 नोव्हेंबरला पुण्यात येणार असल्याची माहिती आहे.

पुण्यातल्या कोव्हीशिल्ड लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांची नोंदणी पूर्ण झाली आहे. भारतात डिसेंबरपर्यंत सिरम इन्स्टिट्यूट कोरोना लसीचे 10 कोटी डोस पुरवणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

सिरम इन्स्टिट्यूटच्या लस उत्पादनासंदर्भात एक महत्त्वपूर्ण करार झाला आहे. त्यामुळे आता सिरमची कोरोना लस साधारण 225 रुपयांना उपलब्ध होणार आहे. यासंदर्भात इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली.

महत्वाच्या बातम्या-

एक देश आणि एक निवडणूक ही भारताची गरज, राष्ट्राच्या हितात राजकारण नको- नरेंद्र मोदी 

पुण्यात मेट्रोच्या खोदकामादरम्यान सापडले मोठे हाडांचे अवशेष

दौऱ्यावर गेलेल्या 6 पाकिस्तानी खेळाडूंचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह!

“सरकारने एमएमआरडीएचे टॉप सिक्युरिटीमधील 100 कोटी रुपये ढापले” 

आम्ही सुपारी घेणारे, मग तुम्ही हप्ते घेणारे आहात का?; मनसेचा शिवसेनेला सवाल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या