Loading...

‘या’ कारणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवस पुण्यात राहणार!

पुणे |  देशभरातील पोलिस महासंचालकाची परिषद 6 ते 8 डिसेंबर रोजी पुण्यात होणार असून या परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्यात दोन दिवस मुक्कामी राहण्याची शक्यता आहे. नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय सुरक्षा सल्लगार अजित डोवाल उपस्थित राहणार असल्याचं कळतंय.

सर्व राज्यांच्या पोलिस महासंचालकांसह गुप्तचर यंत्रणांचे प्रमुख या बैठकीस उपस्थित राहणार आहेत. परिषदेच्या अनुषंगाने गुप्तचर विभागाचे प्रमुख अरविंदा कुमार यांनी गुरूवारी पुण्यात सुरक्षा व्यवस्थेसह परिषदेच्या तयारीचा आढावा घेतल्याचं समजतंय.

Loading...

देशात दर वर्षी पोलिस महासंचालक परिषदेचं आयोजन करण्यात येतं. गेल्या वर्षी ही परिषद गुजरातमध्ये झाली होती. यंदा ही परिषद पुण्यात होत आहे. या परिषदेत नरेंद्र मोदी पोलिस अधिकाऱ्यांसमवेत देशांतर्गत सुरक्षेबाबात चर्चा करणार असल्याचं कळतंय.

दरम्यान, पाषाण येथील ‘आयसर’ संस्थेत ही परिषद होणार आहे. तर पंतप्रधानांच्या निवासाची व्यवस्था राजभवनात करण्याची दाट शक्यता आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या- 

 

 

Loading...

 

 

 

Loading...