तिसरी चूक केल्यास होत्याचे नव्हते होईल; पंतप्रधानांचा पाकिस्तानला इशारा

लखनऊ | पुलवामा येथे हल्ला करुन पाकिस्तानने दुसरी चूक केली. पण जर तिसरी चूक केली तर होत्याचे नव्हते होईल, असा सूचक इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला दिला आहे. उत्तर प्रदेशात मोरादाबाद येथील सभेमध्ये ते बोलत होते.

पुलवामा हल्ल्यानंतर आम्ही त्यांच्या घरात घुसलो व एअर स्ट्राइक केला. त्यामुळे पाकिस्तानला आता चांगली अद्दल घडली आहे, असं पंतप्रधान म्हणाले आहेत.

याआधी दहशतवादी भारतात यायचे आणि हल्ला करुन परत जायचे. आणि काँग्रेस सरकार जगासमोर रडगाणे करायची, असं त्यांनी म्हटलं आहे.

आताचा नविन भारत आहे. हल्ल्याला प्रत्युत्तर देणं भारताला चांगलंच माहित आहे, असंही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात, पवार साहेब हे वागणं बरं नव्हं…!

-आढळराव पडले दिल्लीत भारी; पंतप्रधान मोदींनी केलं तोंडभरून कौतुक

-बारामतीत आता मोदींचं नव्हे तर अमित शहांचं वादळ येणार! तारीख ठरली

-काँग्रेसला चांगली अद्दल घडवा; नरेंद्र मोदींचा घणाघात

-बटलर आला आणि मुंबईला असा तडाखा देऊन गेला की बास रे बास!