सर्जिकल स्ट्राईकच्या वेळी काँग्रेसला शाेकसभा सुरु आहे असं वाटत होतं- नरेंद्र मोदी

जयपूर | सर्जिकल स्ट्राईकच्या वेळी काँग्रेसला शाेकसभा सुरु आहे असं वाटत होतं, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केली आहे.राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत नरेंद्र मोदी बाेलत होते.

काँग्रेसकडून भारतीय सैन्याचा अपमान दररोज केला जातो, असा आरोप नरेंद्र मोदींनी केला आहे. 

सर्जिकल स्ट्राइकचा फोटो किंवा व्हीडिअो दाखवा अशी मागणी काँग्रेस करतं. सैनिक सीमेवर बंदूक घेऊन जातात की कॅमेरा घेऊन?, असा सवाल नरेंद्र मोदींनी काँग्रेसला विचारला आहे.

दरम्यान, राजस्थान विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. काँग्रेस आणि भाजपकडून जोरदार चिखलफेक सुरु आहे. 

महत्वाच्या बातम्या-

-आम्ही राम मंदिराचा विषय अजून सोडून दिलेला नाही- उद्धव ठाकरे

-आता कितीही वेळा काढा एटीएममधून पैसे; स्टेट बँकेच्या ग्राहकांसाठी खुशखबर

-कांदा विकून मोदींना पाठवली होती मनी आॅर्डर; त्याला मिळाला ‘हा’ प्रतिसाद

-माझं नशीब देशातील सव्वाशे कोटी जनतेच्या हातात- नरेंद्र मोदी

-दंगलीची माहिती असेल तर पोलिसांना द्या; शिवसेनेनं राज ठाकरेंची उडवली खिल्ली