नवी दिल्ली | मोदी सरकारमधील नव्या मंत्रीमंडळाचे खातेवाटप आज जाहीर करण्यात आलं आहे. यामध्ये महाराष्ट्रातील नितीन गडकरी, पियूष गोयल, प्रकाश जावडेकर, रामदास आठवले, रावसाहेब दानवे, संजय धोत्रे, अरविंद सावंत या सात मंत्र्याचा सामावेश आहे.
नितीन गडकरी यांना रस्ते वाहतूक मंत्रालयाची जबाबदारी सोपावण्यात आली आहे. पियूष गोयल यांना रेल्वे मंत्रीपद, प्रकाश जावडेकर यांना माहिती प्रसारण आणि वन विभाग मंत्रालयाचं खातं देण्यात आलं आहे.
रामदास आठवलेंच सामाजिक न्याय मंत्रीपद कायम ठेवण्यात आलं आहे. रावसाहेब दानवेंकडे अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपावण्यात आली आहे.
शिवसेनेचे एकमेव मंत्री असलेले अरविंद सावंत यांच्यावर अवजड उद्योग मंत्रालयाचं खातं देण्यात आलं आहे. अकोल्याचे खासदार संजय धोत्रेंना मनुष्यबळ विकास, दूरसंचार राज्यमंत्रीपद देण्यात आलं आहे.
महत्वाच्या बातम्या
-अमित शहा गृहमंत्री होतील… ‘या’ नेत्याचं भाकित खरं ठरलं!
-बेन स्टोक्सने रचला इतिहास, तब्बल 23 वर्षांपूर्वीच्या विक्रमाची केली बरोबरी
-धक्कादायक! बिहारमध्ये भाजप नेत्याची हत्या
-देशाच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री ठरल्या निर्मला सीतारमण
-रावसाहेब दानवेंना मिळाली ‘या’ खात्याची जबाबदारी
Comments are closed.