बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोदी सोशल मीडिया सोडणार नाहीत; आता केला नवा खुलासा

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी ट्वीट करत आपण सोशल मीडिया सोडणार असल्याचे संकेत दिले होते. मोदींच्या या निर्णयाचे राजकीय वर्तुळात बरेच चर्वन झाले. अखेर पंतप्रधान मोदींनी यावर खुलासा केला आहे. त्यांनी या संदर्भात ट्विट केलं आहे.

या महिला दिनाला (8 मार्च) ज्या महिलांचे जीवन आणि कार्य आपल्याला प्रेरणा देते अशा महिलांना मी माझे सोशल मीडिया खाते चालवायला देणार आहे. यामुळे त्यांना लाखो लोकांना प्रेरणा देण्यास मदत होईल, असं मोदींनी ट्वीट करत म्हटलं आहे.

तुम्ही जर अशा प्रेरणादायी महिलांना ओखळत असाल तर #SheInspiresUs हा हॅशटॅग वापरून अर्ज करा. आणि माहिती पोहचवा, असंही त्यांनी ट्वीटमधून म्हटलं आहे.

दरम्यान, मोदींच्या सोशल मीडिया सोडण्याच्या निर्णयामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. अनेकांनी तर मोदी सोशल मीडिया वापरणार नसतील तर आम्ही देखील वापरणार नाही, अशी भूमिका घेतली होती. मात्र, मोदींच्या या खुलाशाने या चर्चांवर पडदा पडला आहे.

 

ट्रेंडिंग बातम्या-

पवारांचा धसका घेऊन मोदींनी ‘तो’ निर्णय घेतला असावा; भाजप आमदाराची टोलेबाजी

“…म्हणून मोदींनी सोशल मीडिया बंद करायला ८ दिवसांचा वेळ घेतला असेल”

महत्वाच्या बातम्या-

सुप्रिया ताई, विद्या चव्हाणांविरोधात तुम्ही भूमिका घेणार की नाही?- भाजप

“सामनातील भाषा बाळासाहेबांकडून आलेली, भाषा आणि दिशा कधी बदलणार नाही”

सर्वोच्च न्यायालयाचा देवेंद्र फडणवीसांना झटका; टेंशन वाढणार!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More