नरेंद्र मोदींनी युवकांचे, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले नाहीत – राहुल गांधी

नरेंद्र मोदींनी युवकांचे, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले नाहीत – राहुल गांधी

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी भ्रष्टाचार, रोजगार आणि शेतकऱ्यांचे प्रश्न या मुद्यांवर निवडून आले होते पण त्यांनी ते सोडवले नाहीत, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.

देशातील जनतेला ईव्हीएम बद्दल संशय आहे, हा संशय भारतातचं नाही तर तो परदेशातही आहे, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. काँग्रेसच्या विजयानंतर पहिल्यांदाच पत्रकारांशी ते बोलत होते.

राहुल गांधी यांनी तीन राज्यातील मावळत्या मुख्यमंत्र्याचं आभार मानले आहेत. तेलंगणा आणि मिझोरममध्ये विजय मिळवलेल्या पक्षांचही अभिनंदन केलं आहे.

दरम्यान, नोटाबंदी आणि राफेल करार हे मोठे घोटाळे आहेत, असा आरोप राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर केला आहे. 

महत्वाच्या बातम्या 

-RBI च्या नव्या गव्हर्नरनी केलं होत नरेंद्र मोदींच्या या सर्वात मोठ्या निर्णयाचं समर्थन

-कोण आहेत शक्तिकांत दास?

-मोदी सरकारचा उलटा प्रवास सुरु – अरविंद केजरीवाल

-बारामती घडवायला पवार कुटुंबाला 50 वर्षे; पुरंदर-हवेली 9 वर्षात ‘त्या दिशेने’- शिवतारे

जे नको ते मतदारांनी नाकारलं; उद्धव ठाकरेंनी केलं मतदारांचं अभिनंदन

Google+ Linkedin