नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फिटनेस चॅलेंज व्हीडिओवर एक रुपया देखील खर्च करण्यात आलेला नाही, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिली आहे. माहिती अधिकारांतर्गत विचारलेल्या प्रश्नावर पीएमओनं हे स्पष्टीकरण दिलं आहे.
जूनमध्ये क्रीडामंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी फिटनेस चॅलेंज सुरु केलं होतं. त्यांनी विराट कोहलीला फिटनेस चॅलेंज दिलं होतं. विराटनं ते पूर्ण करत अनुष्का शर्मा, महेंद्रसिंह धोनी आणि नरेंद्र मोदींना फिटनेस चॅलेंज दिलं होतं.
मोदींनी हे चॅलेंज पूर्ण केलं होतं. मात्र यासाठीच्या व्हीडिओवर 35 लाख रुपये खर्च करण्यात आल्याची टीका झाली होती. मात्र पीएमओने हा दावा फेटाळून लावला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-चंद्रावर आहे गोठलेल्या स्थितीतील पाणी; नासाच्या शास्त्रज्ञांचा मोठा खुलासा
-मुंबईतील आमदारांचे रिपोर्ट कार्ड जाहीर; कोण आहे पहिल्या क्रमांकावर?
-वाजपेयींची आठवण म्हणून ‘या’ शहराचं नाव होणार ‘अटल नगर’
-सातासमुद्रापार शिवरायांचा डंका; जयघोषांनी दुमदुमली अमेरिका….
-मराठ्यांचा केरळला मदतीचा हात; अनेक जिवनावश्यक वस्तू पाठवल्या!