नवी दिल्ली | आज 74 वा प्रजासत्ताक दिन (Republic Day) आहे. 26 जानेवारी हा दिवस भारतासाठी विशेष आहे. देशातला प्रत्येक नागरिक, मग तो भले कुठल्याही जाती, धर्माचा असो, तो प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करतो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा. यंदाचा प्रजासत्ताक दिन खास आहे. कारण स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवादरम्यान आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतोय. देशातील महान स्वातंत्र्य सेनानींच स्वप्न साकार करण्यासाठी आपण सर्व एकजुटीने पुढे जाऊया, असं मोदींनी या टि्वटमध्ये म्हटलंय.
प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्ली, मुंबईतील इमारतींना तिरंगा रंगाची आकर्षक विद्युत रोषणाई करत सरकारी इमारतींना तिरंगी साज चढवला आहे.
प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबईतील पोलीस देखील सज्ज झाले आहेत. मुंबई पोलिसांकडून खबरदारी म्हणून मोठा बंदोबस्त करण्यात आलाय.
महत्त्वाच्या बातम्या-
- किंग खाननं लाडक्या लेकीसाठी केलेली ‘ती’ कमेंट चर्चेत
- जो जिता वही सिकंदर, सिकंदरच्या खेळीनं भूपेंद्रसिंहला दाखवलं आसमान
- Shraddha Walkar Case| हत्येच्या ‘त्या’ रात्री नेमकं काय घडलं?
- ‘बागेश्वर महाराजांवर गुन्हा दाखल…’, नागपूर पोलिस आयुक्तांकडून महत्वाची अपडेट समोर
- ‘हे’ खाल्यानंतर तुमच्या केसांची वाढ थांबता थांबायची नाही