बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘राज्यात भाजपचं सरकार आल्यावर….’; नरेंद्र मोदींनी बंगालच्या जनतेला दिला शब्द

नवी दिल्ली | सध्या पश्चिम बंगालमध्ये येत्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहायला सुरूवात झाली आहे. पाच राज्यांमध्ये निवणुका जाहीर झाल्या असल्या तरी पश्चिम बंगालच्या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं असून ही निवडणुक चुरशीची होणार आहे.  भाजप आणि तृणमूल काँग्रेस पुर्ण ताकदीनिशी मैदानात उतरले आहेत. याच पार्श्वभूमीवर पुरुलिया येथे प्रचारसभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोेदींनी बंगालच्या जनतेला शब्द दिला आहे.

राज्यामध्ये भाजपचं सरकार आल्यावर अत्याचार करणाऱ्या प्रत्येकावर कारवाई केली जाईल आणि  राज्यात पुन्हा एकदा कायद्याचं राज्य येईल, असा शब्द नरेंद्र मोदींनी बंगालच्या जनतेला दिला आहे. यावेळी बोलताना त्यांनी ममता बॅनर्जींवर निशाणा साधला. ममता दीदींनी पश्चिम बंगालची वाईट अवस्था करुन ठेवल्याचा आरोपही मोदींनी केला. गुन्हे आहेत, गुन्हेगार आहेत मात्र ते तुरुंगात जात नाहीत. माफिया आहेत, घुसखोरी करणारे आहेत मात्र ते मोकाट फिरत असल्याचं मोदी म्हणाले.

24 उत्तर परगनामध्ये एका डझनहून अधिक ठिकाणी बॉम्बस्फोट झाले. भाजपच्या कार्यकर्त्यांना लक्ष्य करण्यात आलं. हे सर्व योग्य नाही. हा सूड उगवण्याचा प्रकार, अत्याचार आणि माफियाराज यापुढे चालणार नाही, असा इशाराही मोदींनी दिला आहे.  यावेळी मोदींनी ममता बॅनर्जींवरही टीकास्त्र सोडलं.

दरम्यान, ममता या दलित, आदिवासी, एससी आणि एसटी वर्गातील लोकांसोबत कधीच उभ्या राहिल्या नाहीत. त्यांनी दहा वर्ष भ्रष्टाचार करुन या लोकांचं नुकसान केल्याचा आरोप मोदींनी केला.

 

 

थोडक्यात बातम्या-

राखी सावंतचा फॅन्स सोबतचा क्वालेटी टाईम पाहून तुमचं देखील होईल मनोरंजन, पाहा व्हिडीओ

सावधान! जर तुम्हीही शेअर करत असाल फेसबुक ग्रुपवर ही माहिती

पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वेवरील टोलवसुलीवरून न्यायालयाचा ‘एमएसआरडीसी’ ला दणका; कॅगला दिले ‘हे’ आदेश

‘वर्षभरात देशातील सर्व टोल हटवणार’; नितीन गडकरींची मोठी घोषणा!

…त्या व्हिडीओवर शरद तांदळेंनी मौन सोडलं, म्हणाले, “सत्य असत्याशी मन केले ग्वाही…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More