…म्हणून नरेंद्र मोदींना मिळाला पहिलाच फिलीप कोटलर पुरस्कार

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पहिला फिलीप कोटलर पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. हा जागतिक पातळीवरचा पुरस्कार असून फिलीप कोटलर हे आधुनिक मार्केटिंगचे जनक म्हणून ओळखले जातात.

देशाचं नेतृत्व उत्कृष्टपणे केल्यानं भारतानं मोठ्या प्रमाणावर आर्थिक, सामाजिक आणि तंत्रज्ञानात प्रगती केली आहे, यामुळं त्यांना फिलिप कोटलर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं, असं मानपत्रात म्हटलं आहे. PMO नं याबाबत ट्विट केलं आहे. 

फिलीप कोटलर पुरस्काराच्या मानपत्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात ‘मेक इन इंडिया’ या उपक्रममामुळं भारतात नवनिर्मिती आणि मूल्यवर्धित उत्पादनाचं केंद्र निर्माण झालं, असं म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या मेक इन इंडिया, स्टार्ट अप इंडिया, डिजिटल इंडिया आणि स्वच्छ भारत या उपक्रमांमुळे भारताची नवी ओळख निर्माण झाली, असा उल्लेख मानपत्रात आहे.

महत्वाच्या बातम्या-

-श्रीदेवीच्या भूमिकेत दिसणार प्रिया प्रकाश वारियर, पाहा सिनेमाचा टीझर

-विधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांचं निधन

-पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यासाठी तब्बल १ हजार झाडं कापली! 

-आता व्हॉट्स अ‌ॅपवरही शेड्युल करता येणार मेसेज

-विरोधात जाणाऱ्यांना आडवं करण्याची ताकद आमच्या पक्षात आहे- रावसाहेब दानवे

Google+ Linkedin