नरेंद्र मोदींची डोकेदुखी वाढली; गुजरात दंगल प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात

नवी दिल्ली | गुजरात दंगल प्रकरणी गुजरात उच्च न्यायालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदींसह ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह सनदी अधिकाऱ्यांना क्लीन चीट दिली होती. याप्रकरणी आता सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

झाकीया जाफरी यांनी ही याचिका दाखल केली आहे. 19 नोव्हेंबर रोजी या याचिकेवर सुनावणी होणार आहे.

5 ऑक्टोबर 2017 रोजी गुजरात उच्च न्यायालयाने यासंदर्भात निकाल दिला होता. विशेष तपास पथकाच्या तपासाच्या अहवालाच्या आधारे नरेंद्र मोदींसह इतरांना क्लीन चिट देण्यात आली होती.

या निकालाला दिवंगत माजी खासदार अहसान जाफरी यांच्या पत्नी जाकिया जाफरी यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. मंगळवारी त्यावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर आणि न्या. दीपक गुप्ता यांच्या पीठाने येत्या सोमवारी सुनावणी करण्याचे ठरविले आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची मागासवर्गीय आयोगाची शिफारस?

-ही ‘समृद्धी’ कुणाची?; भाजप आणि शिवसेनेमध्ये पेटला नवा वाद

-मराठा समाजाची प्रतिक्षा संपली? 2 दिवसात सादर होणार अहवाल???

-मराठा आंदोलनाच्या व्यासपीठावर सरकारचे मंत्री आणि विरोधक आमने-सामने

-सरकार मराठा आंदोलकांना खेळवतंय; अजित पवारांचं टीकास्त्र