…तर गांधी घराण्याच्या बाहेरील काँग्रेस अध्यक्ष करून दाखवा!

रायपूर | तुम्ही लोकशाहीचा खूप सन्मान करता तर एकवेळा गांधी घराण्याबाहेरील एका व्यक्तीला पाच वर्षांसाठी काँग्रेस अध्यक्ष करा, असं थेट आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांना दिलं आहे. ते प्रचारसभेत बोलत होते.

गेल्या चार पिढ्यांपासून राज्य करत असलेल्यांनी पहिल्यांदा हिशोब दिला पाहिजे, मात्र तेच चार वर्षांचा हिशेब मागत आहेत, असंही ते म्हणाले.

आपल्या आजीने इंदिरा गांधींनी गरीबी हटावचा नारा दिला होता, पण प्रत्यक्षात काहीच होऊ शकले नाही. नारा देऊन 40 वर्ष झाली आहेत, गरीबी संपली का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

दरम्यान, खोटी आश्वासने देणाऱ्यांवर आपण विश्वास ठेवू नका, आमच्या कामावर विश्वास ठेवून मतदान करा. 

महत्त्वाच्या बातम्या-

-नेहरूंमुळेच चहावाला पंतप्रधान झाला म्हणणाऱ्यांना मोदींचं उत्तर

-तुरूंगात असताना भाजपनं तुम्हाला तिकीट दिलं अन् निवडून आणलं!

-तृप्ती देसाई यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी!

-1 जानेवारीपासून पुण्यात हेल्मेटसक्ती!

-फक्त ‘भारतमाता की जय’ बोलणे म्हणजे राष्ट्रप्रेम नाही!