नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सोमवारी सकाळी केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्वपूर्ण बेठक होणार आहे. या बैठकीत जम्मू-काश्मीरसंदर्भात ऐतिहासिक निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
बैठकीत काश्मीरमधील 360 कलम आणि 35 अ हटवण्यासंदर्भात चर्चा केली जाणार असल्याचं बोललं जात आहे. तत्पूर्वी काश्मीरमधील तणाव परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी राज्याचे पोलीस महासंचालक आणि मुख्य सचिवांची भेट घेतली आहे.
जम्मू-काश्मीर सरकारने रविवारी लागू केलेल्या आदेशानुसार राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहे. तसेच श्रीनगरमध्ये कलम 144 लागू करण्यात आला आहे.
दरम्यान, काश्मीरमधील स्थानिक पक्षांच्या प्रमुखांना नदरकैदेत ठेवण्यात आलं आहे. यामध्ये पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांच्यासह नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांचा समावेश आहे.
महत्वाच्या बातम्या-
-ओमर अब्दुल्ला, मेहबूबा मुफ्ती नजरकैदेत; श्रीनगरमध्ये कलम 144 लागू!
-“जयदत्त क्षीरसागरांवर महाराष्ट्र घडवण्याची जबाबदारी”
-“मुख्यमंत्र्यांचं ‘राज स्टाईल’ भाषण; म्हणतात…”चालू कर रे तो स्क्रीन”
-“ईडीच्या दबावाखाली नाही तर ब्लॅकमेलिंगमुळे आघाडीचे नेते भाजपमध्ये जातात”
Comments are closed.