बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोदी माझे चांगले मित्र, भारताला व्हेंटिलेटर पाठवणार- डोनाल्ड ट्रम्प

नवी दिल्ली | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भरभरून स्तुती केली आहे. भारत एक महान देश आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी माझे चांगले मित्र आहेत. अमेरिका भारताला कोरोनाच्या लढ्यात मदत करणार आहे. त्याच दृष्टीने व्हेंटिलेटर पाठवणार असल्याची घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे.

भारतात कोरोनावर लस तयार करण्याचं मोठं काम सुरु आहे. भारताकडे चांगले वैज्ञानिक आणि संशोधन आहे. भारतासोबत कोरोनाची लस विकसित करण्याचं काम सुरु आहे, असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत.

भारत आणि अमेरिका एकत्र मिळून कोरोनावर लस विकसित करु, असा विश्वास व्यक्त करताना दोघे मिळून अदृश्य कोरोना विषाणूला नष्ट करु असा निर्धार ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, मी काही कालावधीआधीच भारतातून आलोय आणि आम्ही भारतासोबत एकत्र काम करत आहोत. अमेरिकेमध्ये भारतीय मोठ्या प्रमाणात आहेत. यातील अनेकजण लस शोधण्याच्या कामात आहेत, असंही ट्रम्प म्हणाले.

 

 

ट्रेंडिंग बातम्या-

“ठाकरे सरकार जेवढा खिळखिळं करण्याचा प्रयत्न कराल, तेवढं हे सरकार मजबूत आणि गतीमान होईल”

“खडसे, पंकजा, बावनकुळे तावडे यांच्या भूकंपातून नवी वाट पेटू नये म्हणून भाजपने सावध राहावं”

महत्वाच्या बातम्या-

LOCKDOWN- 4 : पाहा कसा असेल महाराष्ट्रातलं चौथं लॉकडाऊन…

स्थलांतरित मजुरांच्या जागी स्थानिक भूमीपुत्रांना नेमा- उद्योगमंत्री सुभाष देसाई

कोरोनाने भारतात विक्रम मोडला; चीनपेक्षा जास्त झाली रूग्णसंख्या

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More