पुन्हा नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे- रावसाहेब दानवे

पुणे | पुन्हा नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे, असं भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे म्हणाले. ते पिंपरीत पुणे जिल्ह्यातील शिरूर मावळ लोकसभा मतदारसंघाच्या पक्ष आढावा बैठकीत बोलत होते.

दोन्ही कॉंग्रेसने यात्रा काढल्या. पण त्यांना अद्याप आपला पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरवता आलेला नाही. त्यामुळेच मायावती त्यांच्यापासून दुरावल्या आहेत.आम्ही, मात्र आमचा पीएम ठरविला आहे. ते नरेंद्र मोदी आहेत, असं ते म्हणाले.

त्यांना पंतप्रधान करण्यासाठी कार्यकर्त्यांना आपले काम चांद्यापासून बांद्यापर्यंत वाढवावे लागणार आहे. त्यात सध्या भाजपची हवा आहे. 

दरम्यान, आघाडी सरकारांचा अनुभव चांगला नसल्याने जनता कॉंग्रेससह विरोधी पक्षांना मान्यता देणार नाही. त्यांनी खोडा घालण्याचेच काम केले आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

महत्त्वाच्या बातम्या-

-शरद पवार आणि राज ठाकरेंमध्ये विमान प्रवासात नेमकी काय चर्चा झाली?

-पंतप्रधान नरेंद्र मोदी या ‘नमकहराम’ला ओळखा- जिग्नेश मेवाणी

-…तर सोलापूरातून फिरणं बंद करेन; प्रणिती शिंदेंना खासदार बनसोडेंची धमकी

-…तर मुंबईत काय काय करता ते सोलापूरकरांना सांगेन; बनसोडेंचं प्रणिती शिंदेंना प्रत्त्युत्तर

-ख्रिस गेलला पार्टी पडली महागात; शेजाऱ्यांची मुंबई पोलिसांकडे तक्रार!

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या