Top News

नरेंद्र मोदी देशाला मजबूत करण्याऐवजी बूथ मजबूत करत आहेत, काँग्रेसचा हल्लाबोल

नवी दिल्ली |  देश ज्या परिस्थितीतून जात आहे त्या परिस्थिती असताना नरेंद्र मोदी देशाला मजबूत करण्याऐवजी बूथ मजबूत करत आहेत, असा हल्लाबोल काँग्रेस प्रवक्ते रणदीर सुरजेवाला यांनी पंतप्रधान मोदींवर केला आहे.

पंतप्रधान मोदींनी आज मेरा बूथ सबसे मबजूत या कार्यक्रमाअंतर्गत आगामी निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन भाजपा कार्यकर्त्यांशी संवाद साधला. विरोधी पक्षांनी नरेंद्र मोदींच्या संवाद साधण्यावर जोरदार टीका केली आहे.

विरोधी पक्ष तुम्हाला नकारात्मक दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न करतील मात्र त्यांच्या प्रयत्नांनी तुम्ही विचलित होऊ नका. सकारात्मक गोष्टी पाहा… असं म्हणत पंतप्रधान मोदींनी आज ‘मेरा बुथ सबसे मजबूत’ या कार्यक्रमात कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

पंतप्रधानांनी आज भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला खरा पण आज देशातली सर्वांगीण परिस्थिती पाहता त्यांनी खरंच हा संवाद साधायला हवा होता का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

भारतीय लष्कराकडून कारवाईचे पुरावे सादर, पाकिस्तानच्या खोटेपणाचा बुरखा फाडला!

… तोपर्यंत आम्ही दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट करत राहू- भारतीय लष्कर

“सोशल मीडियावर युद्धाची पोस्ट टाकणाऱ्यांनो तुमच्यात एवढाच जोश असेल तर सैन्यात सामील व्हा”

विरोधकांचं महागठबंधन म्हणजे महामिलावट आहे- नरेंद्र मोदी

‘मेरा बुथ सबसे मजबूत’ म्हणत पंतप्रधान मोदींनी साधला भाजप कार्यकर्त्यांशी संवाद, विरोधी पक्षांनी सोडलं टीकास्त्र

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या