बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नरेंद्र मोदी देशातील आणि भाजपचे सर्वात मोठे नेते- संजय राऊत

जळगाव | शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत विरोधी पक्ष भाजपवर निशाणा साधत असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर राज्यात संजय राऊत आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात शाब्दिक युद्ध रंगलं आहे. मात्र अशातच संजय राऊत यांनी नरेंद्र मोदींचं कौतुक केलं आहे.

नरेंद्र मोदी हे देशातील आणि भाजपाचे सर्वात मोठे नेते आहेत. मोदींमुळे गेल्या 7 वर्षात भाजपला राष्ट्रीय पातळीवर मोठं यश मिळालं असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. जळगावमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी राऊतांनी अनेक गोष्टींवर भाष्य केलं.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे शरद पवार आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी एकत्र येऊन पाच वर्ष पूर्ण करण्याची आश्वासन केलेलं  आहे. प्रत्येक पक्षाची विचारसरणी वेगवेगळी असून अंतर्गत धुसफूस असली तरी आम्ही महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्ष पूर्ण करू, असा विश्वसाही राऊतांनी व्यक्त केला.

दरम्यान, आम्ही दोस्ती करण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो. पण आम्ही जंगलात असणाऱ्या वाघाशी दोस्ती करतो, पिंजऱ्यातल्या वाघाशी नाही. वाघ जोपर्यंत पिंजऱ्याच्या बाहेर होता, तोपर्यंत आमची दोस्ती होती. आता तो पूर्णपणे पिंजऱ्यातला वाघ झाला असल्याचं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला.

 

थोडक्यात बातम्या- 

नाद करा पण शेतकऱ्याचा कुठं! एका झाडावर घेतलं 22 जातींच्या आंब्यांचं उत्पादन

सुशांतच्या वडिलांची याचिका उच्च न्यायालयानं फेटाळली, बायोपिक प्रदर्शनाचा मार्ग मोकळा

शाब्बास पुणेकरांनो! कोरोनामुक्तीच्या दिशेने पुणेकरांचं पहिलं पाऊल, आजचीही आकडेवारी दिलासा देणारी

राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते बुद्धदेव दासगुप्ता यांचं निधन

दिलासादायक! मुंबईतील कोरोना आटोक्यात; सक्रिय रूग्णांसह नव्या बाधितांच्या संख्येत घट

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More