मोदींचा करिष्मा कायम, आज निवडणुका झाल्या तर मोदींचीच सत्ता!

नवी दिल्ली | देशात आजही नरेंद्र मोदींच्या नावाचा करिष्मा कायम आहे. सी व्होटरनं नुकत्याच केलेल्या सर्व्हेतून ही बाब समोर आलीय. एवढंच नव्हे तर आज निवडणुका झाल्या तर पुन्हा एकदा मोदींचीच सत्ता येऊ शकते, असंही समोर आलंय. 

सी व्होटरनं घेतलेल्या सर्व्हेत पंतप्रधानपदासाठी सर्वाधिक 63 टक्के लोकांनी नरेंद्र मोदींच्या नावाला पसंती दिलीय. तर राहुल गांधी यांच्या नावाला फक्त 13 टक्के लोकांनी पसंती दिलीय. 

आजच्या घडीला लोकसभा निवडणूक झाली तर भाजपला 335 जागा मिळतील, असं हा सर्व्हे सांगतो. तर दुसरीकडे काँग्रेसला 89 तर अन्य पक्षांना 119 जागा मिळू शकतात.