Top News

हिमालयात काहीतरी विशेष आहे; नरेंद्र मोदींनी पोस्ट केले आणखी काही फोटो

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केदारनाथ यात्रेवरुन मोठा गदारोळ माजला आहे. अशातच मोदींनी आपल्या सोशल मीडियावर आणखी एक फोटो पोस्ट केला आहे.

लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपताच मोदींनी हिमालयातील केदारनाथ गाठलं. दर्शनासह त्यांनी याठिकाणी एका गुहेत ध्यानसाधना केली.

आपल्या ध्यानसाधनेचे फोटो सोशल मीडियावर टाकल्याने अनेकांनी मोदींना ट्रोल केलं होतं. ध्यानसाधना करताना कोणी कॅमेरामन घेऊन जातो का? अशी टीका मोदींवर करण्यात आली होती.

दरम्यान, मोदींनी आज आणखी एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. “भव्य-दिव्य, शांत आणि आध्यात्मिक. हिमालयात काहीतरी विशेष आहे. या पर्वतावर पुन्हा येणं हा खूपच चांगला अनुभव असतो, असं मोदींनी म्हटलं आहे. 

महत्वाच्या बातम्या

-नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार की नव्या चेहऱ्याला मिळणार संधी?

-नवज्योत सिद्धूंना माझ्याजागी मुख्यमंत्री व्हायचं आहे- पंजाबचे मुख्यमंत्री

-“रावसाहेब दानवेंनी आपल्या लायकीनुसार काम करावं”

पश्चिम बंगालमध्ये बाबुल सुप्रियो यांना तृणमूल समर्थकांचा घातला घेराव

-इंदापुरातून सुळेंनाच आघाडी; दिलेला शब्द पाळण्याची काँग्रेसकडे परंपरा- हर्षवर्धन पाटील

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या