बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नरेंद्र मोदींचा नवीन मास्टर प्लॅन; उद्या लाँच करणार ‘ही’ जबरदस्त योजना

नवी दिल्ली |  कोरोना महामारीत झालेलं आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी देशात नवनवीन योजना आणल्या जात आहेत. देशाची अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी तरूणांना रोजगार मिळणं गरजेचं आहे. याचसंदर्भात एका महत्त्वाच्या योजनेची घोषणा नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून केली होती. ‘पीएम गती शक्ती योजना’ असं या योजनेचे नाव असून उद्या म्हणजे 13 ऑक्टोबरला ही योजना लाँन्च केली जाणार आहे.

16 मंत्रालय व विभागांना एकत्र एकाच प्लॅटफॉर्मवर आणण्याचं काम ही योजना करणार आहे. गती शक्ती योजनेअंतर्गत एक वेबसाईट तयार केली जाईल. ज्या वेबसाईटमध्ये केंद्र सरकारच्या सर्व योजनांची, प्रकल्पांची माहिती एकत्र दिली जाईल. म्हणजे एका मंत्रालयाच्या प्रकल्पाची माहिती इतर मंत्रालयांसाठी उपलब्ध असेल. जेणेकरून इतर मंत्रालयांना त्या प्रकल्पानुसार त्यांच्या प्रकल्पाचे नियोजन करता येईल. यामुळे पैसे वाचण्यास मदत होणार आहे.

या गती शक्ती योजनेमध्ये 16 मंत्रालयातील प्रत्येकी एक अधिकारी या योजनेच्या सचिवांसोबत जोडला जाणार आहे. प्रत्येक मंत्रालय त्यांच्या प्रकल्पांवर चर्चा करेल आणि त्याबद्दल वेबसाईटवर अपलोड करेल. या माहितीमध्ये प्रकल्पाचं ठिकाण, त्याठिकाणी जाण्याचे पर्याय, प्रकल्पाची किंमत, प्रकल्प पूर्ण होण्याची तारीख, त्याचे फायदे धोके ही सर्व माहिती उपलब्ध असेल, ज्यामुळे एका प्रकल्पाची सर्व माहिती इतर विभागांना वेबसाईटवर मिळेल.

या योजनेसाठी 100 लाख करोड रुपये देण्याचा निर्णय पंतप्रधान मोदींनी घेतला आहे. गती शक्ती योजना देशातील तरूणांना रोजगार मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. काही दिवसांनंतर या योजनेत राज्य सरकारे आणि खासगी कंपन्यांनाही समाविष्ट केलं जाण्याची शक्यता आहे. नरेंद्र मोदी यांची अनेक दिवसांपासून सर्व मंत्रालय एकत्र जोडण्याचे विचार सुरू होते. गती शक्ती योजनेमुळे ते शक्य झाले आहे. शिवाय ही योजना पंतप्रधानांचा मास्टर प्लॅन असल्याचं बोललं जात आहे.

थोडक्यात बातम्या-

आमदार रवी राणांच्या अडचणी वाढल्या; आमदारकी धोक्यात?

‘मुंबई क्रुझ प्रकरण पुर्णपणे खोटं, शाहरूख खान त्यांच्या निशाण्यावर’; शत्रुघ्न सिन्हा संतापले

“शिवसेनेच्या दळिद्री पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्याची सफरचंद चोरून खालली”

विराटचं स्वप्न भंगलं! रोमांचक सामन्यात कोलकाताचा बंगळुरूवर दणदणीत विजय

वाह छेत्री वाह! सुनिल छेत्रीने केली महान फुटबॉलपटू पेलेच्या व्रिकमाची बरोबरी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More