रक्षाबंधनाच्या अगोदर नरेंद्र मोदींनी महिलांना दिलं हे खास गिफ्ट; केली मोठी घोषणा!
नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रक्षाबंधनाच्या अगोदर महिलांना एक खास गिफ्ट दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला उद्योजकांसाठाी मोठी घोषणा केली आहे. मोदींनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ‘आत्मनिर्भर नारी’ या कार्यक्रमात मोदींनी सहभाग घेतला होता.
महिला उद्योजकांना 1 हजार 625 कोटी रुपयांची रक्कम देण्याची घोषणा मोदींनी केली आहे. पंतप्रधान मोदींनी आज दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका मिशनशी संबंधित महिला स्वयंरोजगार गटांच्या सदस्यांशी संवाद साधला.
खाद्यपदार्थांवरील प्रक्रिया असो वा महिला शेतकरी उत्पादक संघ असो किंवा मग दुसरे स्वयंरोजगार समूह, महिलांच्या लाखो गटांना 1 हजार 600 कोटी रुपयांहून अधिकची मदत देण्यात आली असल्याचं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, मास्क आणि सॅनिटायझर करणं असो किंवा गरजूंपर्यंत जेवण पोहोचवणं, स्वयंरोजगार गटाच्या महिलांनी केलेलं काम अतुलनीय आहे. आम्ही सत्तेत आलो त्यावेळी महिलांकडे बँकेचं खातं नव्हतं. अनेक महिला बँकांपासून वंचित असल्याचं मोदींनी सांगितलं.
थोडक्यात बातम्या-
“राज्य सरकारच्या सर्कशीतल्या कोलांट उड्यांना जनता त्रासली आहे”
“इंग्रजांनी भारताची लूट केली, त्यांच्यावरचा राग अजूनही डोळ्यात माझ्या सलत आहे”
“घोषणाबहाद्दर विजय वडेट्टीवारांनी राजीनामा द्यावा”
‘लोकसभेवेळी दानवेंनी पैसै वाटून माझा पराभव केला’; शिवसेनेच्या बड्या खासदाराचा गंभीर आरोप
मुसळधार पावसामुळं लिफ्टमध्ये घुसलं पाणी अन्…, पाहा व्हायरल व्हिडीओ
Comments are closed.