बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘प्रत्येक घरात वीज आणि शौचालय पोहोचलं आता…’; लाल किल्ल्यावरुन मोदींकडून नवी घोषणा

नवी दिल्ली | संपूर्ण देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात आलं. त्यानंतर नरेंद्र मोदी देशवासियांना संबोधित करत आहेत. यावेळी मोदींनी महत्वाची घोषणा केली.

देशातील 100 टक्के घरांमध्ये वीज पोहोचली, 100 टक्के घरांमध्ये शौचालय निर्मितीसाठी प्रयत्न केले. आता देशातील प्रत्येक घरात पाण्याचा नळ देण्यासाठी काम करणार आहे, असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

देशातील प्रत्येकापर्यंत चांगल्या आरोग्याची व्यवस्था पोहचवण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. यासाठी आयुष्मान भारत योजनेत गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा पोहचवल्या जात आहेत, नागरिकांना स्वस्त औषधं उपलब्ध करुन दिले जात आहे. आता ब्लॉक स्तरावर आधुनिक रुग्णालयं उभे करण्यावर भर दिला जात आहे. पुढील काळात रुग्णालयांकडे स्वतःचे ऑक्सिजन प्लँट असतील, असंही मोदींनी सांगितलं.

उज्वला योजनेपासून आयुष्मानपर्यंत योजनांची ताकद सर्वसामान्यांना माहिती आहे. मात्र, इतक्यावरच थांबायचं नाहीये. 100 टक्के गावांमध्ये रस्ते असावेत, सर्वांकडे बँक खाते असावेत, सर्वांकडे आयुष्मान कार्ड असावे, घरकुल योजनेतून प्रत्येक हक्काच्या व्यक्तीला घर द्यायचं आहे, असंही नरेंद्र मोदी म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम भारतात, 54 कोटींपेक्षा जास्त लोक लसवंत- नरेंद्र मोदी

लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ध्वजारोहन

आज 75 वा स्वातंत्र्यदिन; पंतप्रधान मोदी लाल किल्ल्यावरुन ध्वजारोहन करणार

“कष्टाने मिळालेलं स्वातंत्र्य वाचेल की नाही याची शंका निर्माण करणारं वातावरण सध्या देशात”

दिलासादायक! महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More